इंडिगोच्या फ्लाइटमध्ये हेव्ही एयर टर्ब्युलन्स; प्रवासी भेदरले, रडू लागले, 30 मिनिटं आकाशातच विमानाच्या घिरट्या
Indigo Flight Heavy Air Turbulence: जोधपूरहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये प्रवासी मधेच रडायला लागले. हे प्रकरण इंडिगोच्या जोधपूर ते जयपूर फ्लाइट 6E-7406 शी संबंधित आहे.
Jaipur Jodhpur Indigo Flight Heavy Air Turbulence: नवी दिल्ली : एखाद्या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर त्याच्या संपूर्ण प्रवासात अनेकदा टर्ब्युलन्स (Air Turbulence) येतात. विमान (Indigo Flight) प्रवासात टर्ब्युलन्स येणं ही एक साधारण गोष्ट आहे. पण कधीकधी हे टर्ब्युलन्स तोंडचं पाणीच पळवतात. अशीच काहीशी घटना इंडिगोच्या जोधपूर ते जयपूरच्या फ्लाइटमध्ये पाहायला मिळाली. या फ्लाईटमधील प्रवाशांनी हेव्ही टर्ब्युलन्सचा अनुभव घेतला. हा अनुभव इतका भयावह होता की, फ्लाइटमधील सर्वच प्रवासी ढसाढसा रडत होते. सर्वांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. ही घटना इंडिगोच्या जोधपूर ते जयपूर फ्लाइट 6E-7406 शी संबंधित आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, खराब हवामानामुळे इंडिगोच्या जोधपूर ते जयपूर फ्लाइट 6E-7406 फ्लाइटचं लँडिंग करण्याच मोठी अडचण आली. अशा परिस्थितीत विमान तब्बल 30 मिनिटांसाठी आभाळात घिरट्या घालत होतं. तर विमानात बसलेले प्रवासी चांगलेच घाबरल्याचं पाहायला मिळालं. विमानात गोंधळ झाल्यानं प्रवासी घाबरले. खराब हवामानामुळे काही प्रवासी रडायला लागले. फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांनी दावा केला की, त्यांनी विमानात असा गोंधळ यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. तर अशा टर्ब्युलन्सचा अनुभव यापूर्वी कधीही घेतला नव्हता.
हेव्ही एयर टर्ब्युलन्समुळे ऑक्सिजन बॅग्सही उघडल्या; प्रवाशांमध्ये गोंधळ
इंडिगोच्या फ्लाइटमधील प्रवाशांनी हादरवणाऱ्या टर्ब्युलन्सचा अनुभव घेतला. एवढ्या हेव्ही टर्ब्युलन्समुळे फ्लाइटमधील ऑक्सिजनच्या बॅग्सही उघडल्या. तब्बल 30 मिनिटांसाठी विमान आकाशात घिरट्या घालत होतं. अखेर पायलट्सनी विमान सुखरुप जयपूर विमानतळावर उतरवलं. विमान धावपट्टीवर स्थिरावलं आणि सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
इंडिगो फ्लाइट 6E-7406 जोधपूरहून सकाळी 11:05 वाजता उड्डाण करणार होती आणि 1 तास 15 मिनिटांनी 12:20 वाजता जयपूरला पोहोचणार होती. पण, खराब हवामानामुळे विमानानं जोधपूरहून दुपारी 12.02 मिनिटांनी उड्डाण घेतलं. तर दुपारी 1:42 वाजता विमान जयपूर विमानतळावर उतरलं. यावेळी विमान जयपूरमध्ये तब्बल 25 मिनिटं आकाशात घिरट्या घालत होतं.
एअर टर्ब्युलन्स म्हणजे काय?
जेव्हा हवा गोंधळलेल्या किंवा यादृच्छिक मार्गानं वाहू लागते तेव्हा हवेचा गोंधळ होतो. म्हणजेच, विमान प्रवासादरम्यान ज्यावेळी हवा अनियंत्रितपणे विमानाच्या पंखांवर आदळते, त्यावेळी विमानात एयर टर्ब्युलन्स निर्माण होतो. या टर्ब्युलन्समुळे विमान हवेत वर-खाली हलू लागतं आणि प्रवाशांना जोरदार धक्के बसू लागतात. यालाच एयर टर्ब्युलन्स असं म्हणतात.
विमान प्रवासा एयर टर्ब्युलन्स जाणवल्यास काय काळजी घ्यावी?
विमान प्रवासात एयर टर्ब्युलन्स जाणवणं हे सामान्य आहे. पण कधीकधी हे टर्ब्युलन्स फार भयावह असतात. एयर टर्ब्युलन्समुळे अनेकदा विमान अपघात झाल्याचीही उदाहरण आहेत. तुमच्या विमान प्रवासा दरम्यान एयर टर्ब्युलन्स जाणवल्यास काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं.
- विमान प्रवासात पालट्स आणि क्रू मेंबर्सनं दिलेल्या सुचना ऐकून त्यांचं काटेकोरपणे पालनं करणं आवश्यक असतं.
- एयर टर्ब्युलन्स दरम्यान सीट बेल्ट वापरणं अनिर्वाय असतं. त्यामुळे याबाबत कोणतीही टाळाटाळ न करा सीट बेल्टचा वापर करावा.
- एयर टर्ब्युलन्स दरम्यान सीट बेल्ट काढून उभं राहू नये.
- क्रू मेंबर्स विमानात प्रवाशांची काळजी घेण्यासोबतच सर्व प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करतात. त्यामुळे त्यांच्या सुचनांचं काटेकोरपणे पालन करावं.