Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
हाथरसमध्ये (Hathras) घटनेवर भोले बाबा उर्फ सुरजपाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनं मला खूप दु:ख झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
Hathras Stampede News : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) भोले बाबा उर्फ सुरजपाल (Bhole Baba surajpal) यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी (Hathras Stampede) झाल्याची घटना घडली होती. यामध्ये 121 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 2 जुलै रोजी ही घटना घडली होती. दरम्यान, यावर भोले बाबा उर्फ सुरजपाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनं मला खूप दु:ख झाले आहे. लोकांचा प्रशासनावर विश्वास असायला हवा असे सुरजपाल म्हणाले. या दु:खाच्या काळात देव लोकांना यातून मार्ग काढण्याची शक्ती देवो असंही भोले बाबा म्हणाले.
हाथरसमध्ये सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रथमच सूरजपाल यांचे वक्तव्य समोर आले आहे. 2 जुलैच्या घटनेनंतर मी खूप दु:खी असल्याचे सूरजपालने म्हटले आहे. देव आम्हाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जनतेने शासन आणि प्रशासनावर विश्वास ठेवला पाहिजे. मला विश्वास आहे की अराजकता पसरवणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. वकील एपी सिंग यांच्या माध्यमातून मी समितीच्या सदस्यांना विनंती केली आहे की त्यांनी शोकग्रस्त कुटुंबीय आणि जखमींच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत करावी.
हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?
सत्संगासाठी 80 हजार जणांची परवानगी असतानाही त्या दिवशी 2.50 लाख भाविक जमले होते. सत्संग संपल्यावर भोलेबाबाची चरणधूळ गोळा करण्यासाठी पळापळ झाली. चरणधुळीसाठी अनेक जण बसलेल्यांच्या अंगावरून धावत गेले. यामुळे अनेक जण खाली पडले, त्यांच्या अंगावरून लोक जात राहिले. काही क्षणांत या पळापळीचं चेंगराचेंगरीत रुपांतर झालं. पुढच्या बाजूनं सत्संग समितीचे लोक भाविकांना रोखत होते. त्यामुळे मागे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता आणखी वाढली. या दुर्देवी घटनेमध्ये जीव गुदमरून 121 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 100 पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. अनेकजण यामध्ये जखमीही झाले.
कोण आहे भोले बाबा?
भोले बाबाचं खरं नाव सूरज पाल असे आहे. भोले बाबानं 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातली नोकरी सोडून सत्संग सुरू केला होता. सत्संग सुरू केलेल्यानंतर तो साकार विश्व हरी भोले बाबा बनला. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशात त्यांचे मोठ्या संख्येनं अनुयायी आहेत. भोले बाबासोबत त्याची पत्नीही प्रवचन देते. कोरोनाच्या काळात भोले बाबाचा सत्संग वादात सापडला होता. आता हाथरसची दुर्घटना घडल्यानंतर भोले बाबा फरार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव