(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India: आता अविवाहितांनाही मिळणार पेन्शन; भारतातील 'या' राज्याने केली अनोखी घोषणा
India: भारतातील एका राज्याने अविवाहितांनाही पेन्शन देण्याचं जाहीर केलं आहे, या योजनेसाठी दरवर्षी 240 कोटी रुपये खर्च येणार आहे.
India: भारतात असंख्य पुरुष आणि महिला आहेत ज्यांचं लग्न झालेलं नाही, यातील काही जणांचं लग्नाचं वयही निघून गेलं आहे. तसं लग्नाचं कोणतं ठराविक वय नाही, परंतु भारतात 25 ते 30 वयात मुलांची लग्नं आटपली जातात. तरीही या वयोगटातील लाखो-करोडो पुरुष आणि महिला देशात आहेत, ज्यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. तरी, आज आपण लग्नाच्या वयाबद्दल नाही, तर देशातील एका अशा राज्याबद्दल बोलणार आहोत, जिथे अविवाहितांना पेन्शन दिली जाते. अविवाहितांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कोणत्या राज्यात मिळते अविवाहितांना ही सुविधा?
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या बाजूचे राज्य, म्हणजेच हरियाणात (Haryana) ही योजना दिली जात आहे. गुरुवारी हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Laal Khattar) यांनी याबद्दल घोषणा केली. ते म्हणाले, हरियाणा सरकार 45 ते 60 वयोगटातील अविवाहितांना (Unmarried) 2,750 रुपये मासिक पेन्शन देणार आहे, ज्यात महिला (Woman) आणि पुरुष (Man) दोघांचाही समावेश असेल. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांचं वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं असणार आहे.
किती अविवाहितांना मिळणार लाभ?
जर्मन न्यूज वेबसाइट DW च्या रिपोर्टनुसार, या योजनेचा एकट्या हरियाणातील 71,000 लोकांना फायदा होणार आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, या योजनेसाठी दरवर्षी 240 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हरियाणा राज्य सरकार (Haryana State Government) 40 ते 50 वर्षे वयोगटातील विधवा आणि अविवाहितांनी 2,750 रुपये मासिक पेन्शन देत आहे.
हरियाणातील बहुतांश लोकांचं का नाही होत लग्न?
हरियाणातील बऱ्याच लोकांचं लग्न न होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्या राज्यात लिंग गुणोत्तर (Bad Sex ratio) प्रमाणात मोठ्या प्रमाणात असमतोलता आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत हरियाणातील लिंग गुणोत्तर चांगलं नाही. हरियाणा राज्यात 2011 मध्ये 1 हजार मुलांमागे 879 मुली होत्या. मात्र, आता ही संख्या 917 वर पोहोचली आहे. खरं तर, आता हरियाणा राज्य सरकारच्या वतीने आणि अनेक स्वयंसेवी संस्थांच्या (NGO) वतीने हरियाणातील गावांमध्ये जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहेत, ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी समान असल्याचं सांगण्यात येत आहे. लोकांनी मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव करणं थांबवलं पाहिजे, असं जनजागृती मोहिमेतून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: