(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New York: स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या सर्वात श्रीमंत महिलांची यादी जाहीर; टॉप 100 मध्ये चार भारतीय महिलांना स्थान
Richest self-made women list: फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत स्व-कर्तृत्ववान महिलांमध्ये भारतीय वंशाच्या चार महिलांचा समावेश आहे.
New York: फोर्ब्सची (Forbes) स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या सर्वात श्रीमंत महिलांची यादी नुकतीच जाहीर झाली. जयश्री उल्लाल आणि इंद्रा नूयी यांच्यासह चार भारतीय वंशाच्या महिलांना फोर्ब्सने अमेरिकेतील 100 सर्वात श्रीमंत स्व-कर्तृत्ववान महिलांमध्ये स्थान दिलं आहे. त्यांची एकूण संपत्ती 4.06 डॉलर्स अब्ज इतकी आहे.
1. जयश्री उल्लाल - अरिस्ता नेटवर्क्सच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (कॉम्प्युटर नेटवर्किंग फर्म)
2. नीरजा सेठी - आयटी सल्लागार आणि आउटसोर्सिंग फर्म सिंटेच्या सह-संस्थापक
3. नेहा नारखेडे - क्लाउड कंपनी कॉन्फ्लुएंटचे सह-संस्थापक आणि माजी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO)
4. इंद्रा नूयी - पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा आणि सीईओ
जयश्री उल्लाल यांनी टॉप 100 सर्वात श्रीमंत स्व-कर्तृत्ववान महिलांच्या यादीत 15वं स्थान पटकावलं. उल्लाल यांची संपत्ती 2.4 अब्ज डॉलर्स आहे. 2008 पासून त्या सार्वजनिक-व्यापार करणाऱ्या अरिस्टा नेटवर्क्सच्या अध्यक्षा आणि सीईओ आहेत आणि त्यांच्याकडे सुमारे 2.4 टक्के स्टॉक आहे. अरिस्ता कंपनीने 2022 मध्ये जवळपास 4.4 डॉलर्स अब्जची कमाई नोंदवली. 62 वर्षीय महिलेने सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं आणि सांता क्लारा विद्यापीठात अभियांत्रिकी व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलं.
या यादीत 25व्या क्रमांकावर असलेल्या 68 वर्षीय नीरजा सेठी यांची एकूण संपत्ती 990 कोटी डॉलर्स आहे. सेठी आणि त्यांचे पती भरत देसाई यांनी 1980 मध्ये सह-स्थापलेली सिंटेल, फ्रेंच IT फर्म Atos SE ने ऑक्टोबर 2018 मध्ये 3.4 डॉलर्स अब्जांमध्ये विकत घेतली. सेठीला तिच्या स्टेकसाठी अंदाजे 510 कोटी डॉलर्स मिळाले. त्यांनी त्यांचं बॅचलर ऑफ आर्ट्स/सायन्स आणि मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीतून घेतलं आणि ओकलंड विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स केलं.
38 वयाच्या नेहा नारखेडे या यादीत 50 व्या क्रमांकावर आहेत, त्यांची संपत्ती 520 कोटी डॉलर्स इतकी आहे. लिंक्डइन सॉफ्टवेअर अभियंता म्हणून त्यांनी ओपन-सोर्स मेसेजिंग सिस्टम Apache Kafka विकसित करण्यात मदत केली. यात नारखेडे यांची 6 टक्के मालकी असल्याचं फोर्ब्सने म्हटलं. मार्च 2023 मध्ये, नारखेडेंनी क्लाउड कंपनी कॉन्फ्लुएंटची घोषणा केली, ज्यात त्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत.
इंद्रा नूयी या 67 वर्षीय महिला यादीत 77 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 350 कोटी डॉलर्स इतकी आहे. नूयी या पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा आणि सीईओ आहेत. कंपनीत 24 वर्षांनंतर 2019 मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या. CEO या नात्याने, 67-वर्षीय महिलेने पेप्सिको कंपनींच्या विकासात मोठं योगदान दिलं. नूयी 2019 मध्ये Amazon च्या बोर्डात सामील झाल्या. त्यांनी येलमधून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.
हेही वाचा: