Haryana Violence : हरियाणातील नूहमध्ये हिंसाचार चिघळला! 22 FIR दाखल, 15 जणांना अटक; आतापर्यंत 150 जणांची चौकशी
Nuh Violence : नूह येथील हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 22 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
Haryana Nuh Violence : हरियाणातील नूह (Haryana Violence) येथून उसळलेला हिंसाचाराचा वणवा आता गुरुग्रामपर्यंत पोहोचला (Gurugram) आहे. हिंसाचार प्रकरणी नूह (Nuh Violence) पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. हरियाणातील नूह आणि गुरुग्राम जिल्ह्यात जातीय हिंसाचारानंतर तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर हिंसाचार पसरवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे.
हरियाणातील नूहमध्ये हिंसाचार चिघळला
हरियाणातील नूह येथे विश्व हिंदू परिषदेच्या ब्रज मंडल यात्रेदरम्यान हिंसाचार आणि नंतर गोंधळ झाला. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे. नूहमध्ये दोन दिवस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण परिसरात निमलष्करी दलाच्या 20 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. रेवाडी, गुडगाव, पलवल, फरीदाबादसह 5 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. दरम्यान यामध्ये, 22 जणांवर गुन्हा दाखल केला असून, 15 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, सुमारे 150 पेक्षा जास्त लोकांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे.
22 FIR दाखल, 15 जणांना अटक
नूहचे पोलीस अधीक्षक (SP) यांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत 22 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. 15 जणांना अटक करण्यात आली असून सुमारे 150 जणांची चौकशी करण्यात आली आहे. 31 जुलै रोजी नूह येथे मिरवणुकीत हिंसाचार झाला होता, त्यानंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. यासोबतच इंटरनेटवरही बंदी घालण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ : हरियाणातील हिंसाचार घटनेत पोलिसांकडून 15 जणांना अटक
100 लोकांच्या जमावाकडून धार्मिक स्थळ लक्ष्य
एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली. यातून हिंसाचार भडकला. दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि गोळीबार झाला. यादरम्यान गुडगावचे होमगार्ड नीरज आणि गुरसेवक यांच्यासह 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 50 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इतर जखमी झाले आहेत. नुहमध्ये बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा 1 आणि 2 ऑगस्ट रोजी होणार होत्या. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गृहमंत्री अनिल विज आणि मुख्य सचिव, डीजीपी यांच्यासह इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Haryana: हरियाणात दोन गटात झालेल्या हिंसाचारात दोन होमगार्डचा मृत्यू; परिस्थिती नियंत्रणात, जिल्ह्यात कलम 144 लागू