एक्स्प्लोर

Happy New Year 2022 LIVE : नववर्षाचं जल्लोषात स्वागत; निर्बंध असतानाही मंदिरांमध्ये गर्दी

Happy New Year 2022 LIVE : नवीन वर्षातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Key Events
Happy New Year 2022 Live Updates celebrations photos videos welcoming how world celebrating bye bye 2021 PM Modi wishes Happy New Year 2022 LIVE : नववर्षाचं जल्लोषात स्वागत; निर्बंध असतानाही मंदिरांमध्ये गर्दी
live blog

Background

मुंबई :  आज 31 डिसेंबर. म्हणजेच 2021 या वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या नवीन वर्षाचा आरंभ होतोय. 2022 मध्ये प्रवेश करत असताना कोरोना आणि ओमायक्रॉनचं संकट वाढत चाललं आहे. त्यामुळं नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्याला नव्या निर्बंधांसह करावा लागणार आहे.  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. 

सरकारकडून कालपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.  पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे. 

मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. त्यामुळे गुरुवारी टास्कफोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

काय आहेत निर्बंध?
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत
अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती
पर्यटनस्थळावर जमावबंदी
कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील.

गूगल डूडलच्या खास गोष्टी
गूगलनं आज न्यू इयर सेलिब्रेशन या थीमचं डूडल शेअर केलं आहे. या डूडलमध्ये मेणबत्ती, स्पार्कल, कॅन्डी आणि लाइट्स आहेत. न्यू इयर इव्हसाठी हे डूडल तयार करण्यात आहे. गूगलचे हे डूडल रात्री 12 वाजता लाइव्ह झाले. गूगल डूडलमधील google लेटरमधील O या लेटमध्ये एका कॅन्डीचे डिझाइन आहे. तर G या लेटरला पार्टी हॅट घालण्यात आली आहे. 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता ही कॅन्डी पॉप होणार आहे. या डूडलवर क्लिक केल्यावर तुम्हाला स्क्रिनवर स्पार्कल्स दिसतील.

डूडलसोबत दिला खास मेसेज
' इट्स अ रॅप फॉर 2021, हॅप्पी न्यू इयर इव्ह!' असा मेसेज गूगल डूडलनं त्याच्या डूडलमधून दिला आहे. असं म्हणलं जातयं की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गूगल डूडलचं डिझाइन हे साधे ठेवण्यात आले आहे.वेगवेगळ्या थीमवर आधारित असलेले गूगल डूडल्स नेहमीच यूझर्सचे लक्ष वेधत असतात. काही दिवसांपूर्वी गूगलने खास डूडल तयार केले होते. या डूडलमध्ये गूगलने पॉप्यूलर 'पिझ्झा मेन्यू' ची माहिती दिली होती. 

12:08 PM (IST)  •  01 Jan 2022

महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल

नवीन वर्षाची सुरुवात तुळजाभवानी च्या दर्शनाने करण्यासाठी हजारो भाविक भक्तांनी तुळजापुरात तोबा गर्दी केली आहे महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवीचे दर्शनाचा लाभ घेतला.

11:58 AM (IST)  •  01 Jan 2022

संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक शेगावात दाखल

सरत्या वर्षाला निरोप देऊन नवं वर्षांची सुरुवात संत गजानन महाराजांच्या आरतीने करण्यासाठी शेगावातील मंदिरात आज सकाळी पहिल्या आरतीला भाविकांनी हजेरी लावली. आज नवीन वर्षाची सुरुवात हजारो भाविक संत गजाननाच्या दर्शनाने करत असून देशभरातून हजारो भक्त शेगावात दाखल झाले आहेत.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात
Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
Pune Election 2026 BJP VS NCP: भाजपच्या 'मिशन 125'मध्ये अजितदादांचा अडसर, देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी? बंद दाराआड गुप्त खलबतं
भाजपच्या 'मिशन 125'मध्ये अजितदादांचा अडसर, देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी? बंद दाराआड गुप्त खलबतं
Thane Mahangarpalika Election 2026: ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?
ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?
Embed widget