एक्स्प्लोर

Happy Birthday Ratan Tata : फोर्डने इज्जत काढली, टाटांनी टॅलेंटने घेतला बदला, देशाच्या अनमोल रत्नाला सलाम करायला लावणारे किस्से

Happy Birthday Ratan Tata : फोर्ड कंपनीने केलेल्या अपमानाचा रतन टाटा यांनी टॅलेंटने बदला घेतला. देशाच्या अनमोल रत्नाला सलाम करायला लावणारे किस्से जाणून घ्या.

Happy Birthday Ratan Tata : रतन टाटा यांचे नाव दिग्गज उद्योगपतींपैकी एक आहे. या दिग्गज व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे. 28 डिसेंबर 1937 मध्ये रतन टाटा यांचा जन्म झाला. जेआरडी टाटा यांच्यानंतर टाटा समूहाची (Tata Group) सूत्रे हाती घेण्यापूर्वी रतन टाटा यांना जीवनात अनेक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. त्याच्या आईवडिलांच्या घटस्फोटाचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. जेव्हा त्याच्या आईने दुसरं लग्न केलं तेव्हा त्यांना शाळेत टोमणेही सहन करावी लागली. काही काळापूर्वी रतन टाटा यांनी याबाबतचा त्यांचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. आजीकडून मिळालेल्या धड्यांमुळे त्यांना जीवनात वाईट प्रसंगाना सामोरे जाण्याचे बळ मिळाले.

टाटा समूहाला जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतींच्या घराण्यांपैकी एक बनवण्यात रतन टाटा यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यांचा साधेपणा. एवढ्या मोठ्या व्यावसायिक साम्राज्याला अनेक दशके सांभाळूनही त्यांचा साधेपणा टिकून आहे. रतन टाटा जमिनीशी जोडले जाण्याचे कारण म्हणजे त्यांचे सामान्य माणसांसारखे पालनपोषण. राजपुत्र म्हणून जन्माला आले असतानाही सामान्य माणसांप्रमाणे त्यांनीही शिक्षणापासून करिअरपर्यंतचा प्रवास संघर्षांच्या छायेखाली ठरवला. अनेकांना माहित नसेल की शिक्षण घेत असताना, त्यांनी रेस्टॉरंटमध्ये भांडीदेखील घासावी लागली.

फोर्डने इज्जत काढली, टाटांनी टॅलेंटने बदला घेतला

टाटा समूहाने 1998 मध्ये आपली पहिली हॅचबॅक कार इंडिका लाँच केली, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीने आपला कार व्यवसाय एका वर्षाच्या आत फोर्ड मोटर्सला विकण्याचा निर्णय घेतला. फोर्डचे अधिकारी बॉम्बे हाऊस, टाटा मुख्यालयात आले आणि त्यांनी कार विभाग खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले. फोर्डच्या टीमने रतन टाटा यांना चर्चेसाठी अमेरिकेतील डेट्रॉईट येथे बोलावले. 1999 मध्ये, रतन टाटा आणि त्यांची टीम फोर्ड कंपनीला समूहाचा नवीन ऑटोमोबाईल व्यवसाय विकण्यासाठी डेट्रॉईट येथे पोहोचली. फोर्डच्या अधिकाऱ्यांसोबत रतन टाटा आणि इतर उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत फोर्डच्या टीमने त्यांना सांगितले की, तुम्हांला कल्पना नसताना तुम्ही प्रवासी वाहन विभागात का उतरलात. एवढेच नाही तर फोर्डने सांगितले की, ते टाटा मोटर्सचा कार व्यवसाय विकत घेऊन त्यांच्यासाठी उपकार करतील.

या घटनेनंतर, टाटा मोटर्स संघाने त्याच संध्याकाळी न्यूयॉर्कला परतण्याचा निर्णय घेतला. समूहाचे तत्कालीन चेअरमन रतन टाटा हे पाहून खूप निराश झाले. या 'अपमान' नंतर टाटा समूह भारतात परतला, पण वेळ नेहमी सारखी नसते. 2008 च्या जागतिक आर्थिक संकटात फोर्ड कंपनी दिवाळखोरीत गेली. टाटाने 2008 मध्ये जग्वार लँड रोव्हर ब्रँड (JLR) ब्रँड विकत घेतला. 2008 मध्ये, टाटा मोटर्सने फोर्डकडून जग्वार लँड रोव्हर ब्रँड (JLR ब्रँड) $2.3 बिलियनमध्ये विकत घेऊन आपली दानशूरता दाखवली. त्यावेळी फोर्डचे चेअरमन बिल बोर्ड यांनी टाटांचे आभार मानले आणि जेएलआर विकत घेऊन तुम्ही आमच्यावर मोठे उपकार करत आहात असे सांगितले. यावेळी रतन टाटांसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला.

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 3rd ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
Sudarshan Ghule Beed: सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
Solapur Crime : सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, 1 कोटीच्या खंडणीचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, 1 कोटीच्या खंडणीचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Donald Trump : संपूर्ण जगाने ज्यासाठी इतकी वर्षे प्रयत्न केले ते सगळं केरात जाणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय
संपूर्ण जगाने ज्यासाठी इतकी वर्षे प्रयत्न केले ते सगळं केरात जाणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 12 February 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01PM 12 February 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 12 February 2025Amol Kolhe on Sanjay Raut | शरद पवारांची ही वैयक्तिक भूमिका, अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Eng 3rd ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, वरुण चक्रवर्ती संघाबाहेर! रोहित म्हणाला....
Sudarshan Ghule Beed: सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार
Solapur Crime : सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, 1 कोटीच्या खंडणीचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, 1 कोटीच्या खंडणीचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Donald Trump : संपूर्ण जगाने ज्यासाठी इतकी वर्षे प्रयत्न केले ते सगळं केरात जाणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय
संपूर्ण जगाने ज्यासाठी इतकी वर्षे प्रयत्न केले ते सगळं केरात जाणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय
Nashik Crime News : भर रस्त्यात तरुणीला मारहाण करत ठार मारण्याची धमकी; सलग दोन दिवसात दोन घटनांनी नाशिक हादरलं!
भर रस्त्यात तरुणीला मारहाण करत ठार मारण्याची धमकी; सलग दोन दिवसात दोन घटनांनी नाशिक हादरलं!
Chandrashekhar Bawankule : 90 घेऊन कधी युती टिकते का? राऊतांनी मविआत वादाची ठिणगी पाडताच बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, पवार साहेबांना...
90 घेऊन कधी युती टिकते का? राऊतांनी मविआत वादाची ठिणगी पाडताच बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, पवार साहेबांना...
Sanjay Raut: उदय सामंतांना बाजूला सारुन पुढे आले, म्हणाले मी उत्तर देतो! राऊतांच्या राजकीय दलालीच्या आरोपावर संजय नहार काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंना पुरस्कार का दिला? राऊतांच्या राजकीय दलालीच्या आरोपावर संजय नहार काय म्हणाले?
Sharad Pawar & Sanjay Raut: संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
Embed widget