(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gyanvapi Masjid Case : 'हिंदूंच्या ताब्यात द्यावा ज्ञानवापी परिसर', वाराणसी जिल्हा न्यायालयात दाखल नव्या याचिकेवर आज सुनावणी
Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशीद प्रकरणी न्यायालयात दाखल याचिकेत ज्ञानवापी परिसर हिंदूंच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशीद प्रकरणी न्यायालयात आता आणखी एक याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. माहितीनुसार, दाखल करण्यात आलेल्या नव्या याचिकेत ज्ञानवापी परिसर हिंदूंच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे. विश्व वैदिक सनातन संस्थेचे सरचिटणीस किरणसिंह बिसेन यांनी ही याचिका दाखल केली आहे.
मशिदीचा घुमट पाडण्याचे आदेश देण्याची मागणी
विश्व वैदिक सनातन संस्थेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस किरण सिंह बिसेन यांनी भगवान विश्वेश्वर विराजमान यांचे वकील म्हणून खटला दाखल केला आहे. वादग्रस्त ज्ञानवापी संकुलातील भगवान विश्वेश्वराच्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देण्याचा खटला आहे. याचबरोबर मशिदीचा घुमट पाडण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. राखी सिंगसह इतर महिलांनी दाखल केलेल्या केसपेक्षा हे प्रकरण वेगळे आहे.
काय आहेत मागण्या?
संपूर्ण ज्ञानवापी संकुल हिंदूंच्या ताब्यात द्यावे.
ज्ञानवापी संकुलात विश्वेश्वराच्या नित्य पूजेची व्यवस्था करावी.
ज्ञानवापी संकुलात मुस्लिमांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालावी.
मशिदीचा घुमट पाडण्याचे आदेश जारी करा
आज दुपारी दोन वाजता होणार सुनावणी
हे प्रकरण दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग रवी दिवाकर यांनी सुनावणीसाठी याचिका स्वीकारली असून आज दुपारी दोन वाजता सुनावणीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. याच न्यायमूर्तींनी ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरी वादावर मंगळवारी वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीत जिल्हा न्यायाधीश अजयकुमार विश्वेश यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत पुढील तारीख दिली आहे. आता 26 मे रोजी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी सांगितले की मुस्लिम बाजूच्या याचिकेवर 26 मे रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवून आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशिदीत हिंदू धर्माचं प्रतिक आढळलं; सर्वेक्षण अहवालातून दावा, आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- Kangana Ranaut : ज्ञानवापी प्रकरणावर कंगना म्हणाली..
- Kangana Ranaut : 'काशीमध्ये कणा कणात महादेव'; ज्ञानवापी प्रकरणावर कंगनाची प्रतिक्रिया