गुरुग्राम जमीन खरेदी-विक्री प्रकरण : रॉबर्ट वढेरांविरोधात गुन्हा दाखल
गुरुग्राममधील जमीन खरेदी आणि विक्री प्रकरणी रॉबर्ट वढेरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
![गुरुग्राम जमीन खरेदी-विक्री प्रकरण : रॉबर्ट वढेरांविरोधात गुन्हा दाखल gurugram land issue : FIR file against Robert wadera गुरुग्राम जमीन खरेदी-विक्री प्रकरण : रॉबर्ट वढेरांविरोधात गुन्हा दाखल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/11151046/politics-3-robert-vadra.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुग्राममधील जमीन खरेदी आणि विक्री प्रकरणी रॉबर्ट वढेरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा, डीएलएफ आणि ओंकारेश्वर प्रॉपर्टीज विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वढेरा यांनी तत्कालीन सरकारच्या काळात गुरुग्रामच्या शिकोहपूर गावात जमीन खरेद्री-विक्री व्यवहार केला होता.
जमिनीचा हा व्यवहार झाला त्यावेळी रॉबर्ट वढेरा स्कायलाईट कंपनीचे डायरेक्टर होते.
काय आहे प्रकरण? रॉबर्ड वढेरा यांची कंपनी स्कायलाईटने 2007मध्ये गुरुग्रामच्या शिकोहपूरमध्ये साडे सात कोटींमध्ये साडे तीन एकर जमीन खरेदी केली. त्यानंतर तीन वर्षांनी वढेरा यांच्या कंपनीने या जमिनीची 58 कोटींना डीएलएफ कंपनीला विक्री केली.
याशिवाय गुरूग्राम आणि वजीराबाद परिसरात वढेरा यांच्या डीएलएफ कंपनीने आणखी 350 एकर जमीन हुड्डा सरकारकडून देण्यात आली, ज्यामध्ये वढेरा यांच्या कंपनीला पाच हजार कोटींचा फायदा झाला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)