Morbi Cable Bridge Collapses : गुजरातमध्ये पूल कोसळला, 400 जण नदीत पडले, अनेकजण बुडाल्याची भीती
Morbi Cable Bridge Collapses : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
Morbi Cable Bridge Collapses : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या पूलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केबल पूल कोसळल्यामुळे चारशे लोक नदीत बुडाले आहेत.
मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतरही आज ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
गुजरातमधील मोरबी येथे माच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. छठ पूजासाठी येथे शेकडो लोक उपस्थित राहिले होते. यावेळी पूलावर असणारे चारशे पेक्षा जास्त लोक नदीत बुड्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलाची दुरुस्ती केली होती. गुजरातचे मंत्र्यांनी बचाव कार्य सुरु असल्याची माहिती एबीपी न्यूजला दिली आहे.
Gujarat | A cable bridge collapsed in the Machchhu river, Morbi area today. Several people fear injured. Further details awaited. pic.twitter.com/OZrDTxCWqx
— ANI (@ANI) October 30, 2022
#WATCH | Several people feared to be injured after a cable bridge collapsed in the Machchhu river in Gujarat's Morbi area today. Further details awaited. pic.twitter.com/hHZnnHm47L
— ANI (@ANI) October 30, 2022
या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री बूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, "मोरबीमध्ये केबल पूल कोसळल्यामुळे दुर्घटना झाली आहे, याचं मला दु:ख वाटत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेहण्याचं काम सुरु आहे. जखमींवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनासोबत संपर्कात असून बचावकार्य आणि दुर्घटनेची माहिती घेत आहे."
મોરબીમાં ઝૂલતો પુલ તૂટવાની દુર્ઘટનાથી અત્યંત વ્યથિત છું. તંત્ર દ્વારા રાહત અને બચાવની કામગીરી ચાલુ છે. ઇજાગ્રસ્તોને સત્વરે સારવારની વ્યવસ્થા માટે તંત્રને સૂચના આપી છે. આ સંદર્ભે જિલ્લાતંત્ર સાથે સતત સંપર્કમાં છું.
— Bhupendra Patel (@Bhupendrapbjp) October 30, 2022