![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gujarat Earthquake: गुजरातमधील द्वारका भूकंपाने हादरली! 5 रिश्टर स्केलची नोंद
Gujarat Earthquake: गुजरात राज्यातील द्वारका भागात दुपारी 3:15 वाजता भूकंपचा हादरे जाणवल्याची माहिती.
![Gujarat Earthquake: गुजरातमधील द्वारका भूकंपाने हादरली! 5 रिश्टर स्केलची नोंद Gujarat Earthquake: earthquake of magnitude on the Richer Scale hit 223 km north northwest of Dwarka, Gujarat Gujarat Earthquake: गुजरातमधील द्वारका भूकंपाने हादरली! 5 रिश्टर स्केलची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/efbd63cc3fb96de9ff539212075d7c24_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gujarat Earthquake: गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दुपारी 3:15 वाजता राज्यातील काही भागात जमीन हादरल्याची जाणीव झाली. याची तीव्रता 5 एवढी मोजण्यात आल्याचे भूकंप केंद्राने म्हटले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू द्वारकेच्या उत्तर-वायव्येस 223 किमी अंतरावर होता. या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
भूकंपाचे कारण काय?
पृथ्वीच्या आतील प्लेट्सची टक्कर हे भूकंपाचे मुख्य कारण आहे. पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. जेव्हा या प्लेट्स एखाद्या ठिकाणी आदळतात तेव्हा तिथं एक फॉल्ट लाइन झोन तयार होतो आणि पृष्ठभागाचे कोपरे वळले जातात. पृष्ठभागाचे कोपरे वळल्यामुळे तिथं दबाव निर्माण होतो आणि प्लेट्स तुटू लागतात. या प्लेट्स तुटल्यामुळे आतल्या उर्जेला बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो, त्यामुळे पृथ्वी हादरते आणि आपण त्याला भूकंप समजतो.
भूकंपाची तीव्रता
रिश्टर स्केलवर 2.0 पेक्षा कमी तीव्रतेचे भूकंप सूक्ष्म श्रेणीमध्ये येतात आणि हे भूकंप जाणवत नाहीत. रिश्टर स्केलवर सूक्ष्म श्रेणीचे 8,000 भूकंप जगभरात दररोज नोंदवले जातात. तसेच 2.0 ते 2.9 तीव्रतेचे भूकंप किरकोळ श्रेणीत येतात. असे 1000 भूकंप दररोज होतात, अगदी आपल्याला सहसा जाणवत नाही. अतिशय हलक्या श्रेणीतील 3.0 ते 3.9 तीव्रतेचे भूकंप एका वर्षात 49,000 वेळा नोंदवले जातात.
असे भूकंप जाणवतात पण यामुळे क्वचितच हानी होते. रिश्टर स्केलवर 4.0 ते 4.9 तीव्रतेचे हलक्या श्रेणीतील भूकंप संपूर्ण जगात वर्षात सुमारे 6,200 वेळा नोंदवले जातात. या भूकंपाचे धक्के जाणवत असून घरातील वस्तू हादरताना दिसत आहेत. तथापि, ते नगण्य नुकसान करतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)