एक्स्प्लोर

गुजरातच्या राजकोटमध्ये एका वर्षात तब्बल 1235 बालकं दगावली; मुख्यमंत्री रूपाणींचा बोलण्यास नकार

राजस्थानमधील कोटातील बालकांच्या मृत्यूची घटना ताजी असताना आता गुजरातमधूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकोटमध्ये एका वर्षात तब्बल 1235 बालकं दगावल्याची माहिती उघड झाली आहे. यावर मुख्यमंत्री रूपाणी यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

नवी दिल्ली : पहिल्यांदा उत्तर प्रदेशमधील गोरखपूर, नंतर बिहारचं मुजफ्फरपुर आणि आता राजस्थानच्या कोटा शहरात हजारो बालकांचा अकाली मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता गुजरातमधील राजकोटमध्येही अनेक निष्पाप बालकं दगावल्याची धक्कादायक माहिती आली आहे. राजकोटमध्ये मागील वर्षभरात सरकारी रुग्णालयात 1235 बालकांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या कालवधीतील ही आकेवारी आहे. विशेष म्हणजे गेल्या डिसेंबर महिन्यात तब्बल 134 बालकांचा मृत्यू झाला आहे. यावर मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास टाळटाळ केली. आकडेवारीनुसार राजकोट येथील सरकारी रुग्णालयात मागील एक वर्षात 1235 बालकं दगावली आहेत. जानेवारी 2019 - 122 बालकांचा मृत्यू फेब्रुवारी 2019- 105 बालकांचा मृत्यू मार्च 2019- 88 बालकांचा मृत्यू एप्रिल 2019- 77 बालकांचा मृत्यू मे 2019- 78 बालकांचा मृत्यू जून 2019- 88 बालकांचा मृत्यू जुलै 2019- 84 बालकांचा मृत्यू ऑगस्ट 2019- 100 बालकांचा मृत्यू सप्टेंबर 2019- 118 बालकांचा मृत्यू ऑक्टोबर 2019- 131 बालकांचा मृत्यू नोव्हेंबर 2019- 101 बालकांचा मृत्यू डिसेंबर 2019- 134 बालकांचा मृत्यू याव्यतिरिक्त अहमदाबाद सरकारी रुग्णालयात तीन महिन्यात 265 बालकांचा मृत्यू झालाय. ऑक्टोबर 2019- 93 बालकांचा मृत्यू नोव्हेंबर 2019- 87 बालकांचा मृत्यू डिसेंबर 2019- 85 बालकांचा मृत्यू राजस्थानच्या कोटा शहरात लोन रुग्णालयात काल तीन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर डिसेंबर ते आजपर्यंत मृत्यू झालेल्या बालकांची संख्या 110 वर पोहचली आहे. चालू जानेवारी महिन्यात म्हणजेच मागील चार दिवसांत 10 बालकं दगावली आहेत. माध्यमांमध्ये याची बातमी आल्यानंतर तिथल्या सरकारला आणि प्रशासनाला जाग आली. कोटाच नाही तर राजस्थानच्या अन्य जिल्ह्यातूनही बालकांच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे. कोटनंतर काल बूंदीतूनही बालकं दगावल्याची माहिती समोर आली होती. राजस्थानात बालकांच्या मृत्यूवरुन सोनिया गांधी गेहलोतांवर नाराज - राजस्थानातील कोटा येथे डिसेंबर महिन्यात जेके लोन रुग्णालयामध्ये जवळपास 100 बालकं दगावली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही याप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक रुग्णालयात दररोज 3-4 मृत्यू होतात. त्यामुळे या गोष्टी काही नवीन नाहीत", असे विधान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केलं होतं. या विधानानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली होती. संबंधित बातमी - 105 मुलं दगावलेल्या 'त्या' रुग्णालयाची पाहाणी करायला आलेल्या आरोग्यमंत्र्यासाठी गालिचे अंथरले  2002 Gujarat Riots | 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवालDhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
Embed widget