Guidelines For Social Media Influencers : इन्फ्लुएन्सर्ससाठी नियमावली, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी केंद्राचं पाऊल
Guidelines For Social Media Influencers : सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने इन्फ्लुएन्सर्ससाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.
Guidelines For Social Media Influencers : सोशल मीडियावरील (Social Media) दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून (Advertisement) ग्राहकांचे (Consumer) संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने इन्फ्लुएन्सर्ससाठी (Influencer) नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांना 50 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. सुरुवातीला दिशाभूल करणाऱ्या किंवा चुकीच्या पद्धतीने सशुल्क सामग्रीचा प्रचार केल्यास 10 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास 50 लाखांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे.
फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाची व्याप्ती जसजशी वाढत आहे तसतसे सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सची संख्यादेखील वाढत आहे. यामुळे जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल होण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने इन्फ्लुएन्सर्ससाठी नियमावली तयार केली आहे. जाहिराती सोप्या, स्पष्ट भाषेत असाव्यात. 'जाहिरात' किंवा 'सशुल्क जाहिरात' यांसारख्या संज्ञा वापराव्यात. इन्फ्लुएन्सर्सने अशा कोणत्याही उत्पादन किंवा सेवेचं समर्थन करु नये ज्यामध्ये त्यांनी योग्य परीक्षण केलेलं नाही किंवा त्यांनी ते वैयक्तिकरित्या वापरलेलं नाही.
लाईव्ह स्ट्रिमिंगही नियमावलीच्या कक्षेत
सरकारची ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लाईव्ह स्ट्रीमिंगलाही लागू होणार आहेत. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमद्वारे सेलिब्रेटी किंवा प्रभावशाली व्यक्ती उत्पादनाची जाहिरात करत असतील, तर त्यातही त्यांना त्या उत्पादनाची योग्य माहिती द्यावी लागेल.
जाणून घेऊया काय आहेत नवे नियम?
काय आहे नवी नियमावली?
- पैसे घेऊन ब्रॅंडला प्रमोट केलं तर त्याची माहिती द्यावी लागणार
- संबंधित कंपनीकडून मिळालेल्या पैशांची माहिती द्यावी लागेल
- नियमांचे उल्लंघन केलं तर 10 ते 15 लाख रुपयांचा दंड
- प्रोडक्टची स्तुती देखील जाहिरातीचाच भाग
- वारंवार दोषी आढळल्यास दंडाची रक्कम वाढत जाणार
- सोबतच अकाऊंट देखील सस्पेंड केलं जाणार किंवा
- एन्डोर्समेंवर काही काळ बंदी
कोणत्या गोष्टींसाठी डिस्क्लोजर द्यावं लागेल?
- इन्फ्लूएन्सर एन्डोर्समेंटसाठी पैसे कंपनीकडून घेतलेले असल्यास
- एन्डोर्समेंटसाठी फुकट प्रोडक्ट मिळालं असल्यास
- कोणत्या कंपनीकडून गिफ्ट किंवा ट्रिप्ससारख्या गोष्टी मिळाल्या असल्यास
- एन्डोर्समेंटने कव्हरेज मिळत असल्यास किंवा
- मीडिया पार्टनर जरी बनल्यास कंपनीमध्ये किंवा प्रोडक्ट बनवण्यात हिस्सेदारी असल्यास माहिती द्यावी लागेल
डिस्क्लेमर कसं द्यावं लागणार?
- ठळक आणि स्पष्ट दिसेल असं डिस्क्लेमर द्यावं लागेल
- डिस्क्लेमर ऑडिओ आणि व्हिडीओमध्ये द्यावं लागेल
- लाईव्ह स्ट्रीमिंग असल्यास देखील ठळक अक्षरात डिस्क्लेमर द्यावं लागेल
- भाषा फॉलोअर्सला समजावी अशी असावी असा देखील उल्लेख
हेही वाचा