एक्स्प्लोर
घर खरेदीसाठी 'अच्छे दिन', कर्जाचे हप्ते 2 हजारांनी कमी होणार

नवी दिल्ली : मुंबई-पुण्यासारख्या शहरात तुम्ही तुमचं हक्काचं पहिलं घर खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर केंद्राकडून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. शहरी भागात पहिलं घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर सवलत मिळणार आहे. नोटाबंदीनंतर केंद्र सरकारनं गृह व्याज दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला.
जर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात पहिलं घर घेत असाल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 12 ते 18 लाखांच्या दरम्यान असेल, तर 9 ते 12 लाखांपर्यंतच्या कर्जावर केवळ 3 ते 4 टक्के व्याज दर आकारला जाईल. म्हणजेच 9 ते 12 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 2 हजार रुपयांची बचत होईल.
70 कर्जपुरवठा संस्था, 45 हाऊसिंग फायनान्स कंपन्या, 15 शेड्युल बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका इत्यादींनी केंद्राच्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे.
मध्यम उत्पन्न गटासाठी फायदेशीर ठरणारी केंद्र सरकारची गृहकर्ज व्याज सवलत योजना 1 जानेवारीपासूनच्या कर्जांवर लागू होईल. त्यामुळे 1 जानेवारी 2017 पासून गृह कर्ज घेतलेल्यांनाच याचा फायदा मिळेल. 1 जानेवारीपासून गृहकर्जासाठीचा अर्ज विचाराधीन आहे, तेही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यम उत्पन्न गटासाठी 31 डिसेंबर 2016 रोजी गृहकर्ज व्याज सवलत योजनेची घोषणा केली होती.
संबंधित बातम्या :
पहिलं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, पंतप्रधान आवास योजनेत भरघोस सूट!
VIDEO: गृहकर्जावरील व्याजदरात 3 ते 4 टक्के कपात : पंतप्रधान
हक्काचं घर मिळवून देण्यासाठी योजना
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























