एक्स्प्लोर
...म्हणून मोदींनी चहा विकलेल्या रेल्वे स्टेशनचा विकास होणार नाही!
केंद्र सरकारकडून पंतप्रधान मोदींनी लहानपणी चहा विक्री केलेलं रेल्वे स्थानक विकासित करण्याची कोणतीही योजना विचाराधीन नसल्याचं लोकसभेत स्पष्ट करण्यात आलंय. पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना याबाबतचा खुलासा केला.
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून पंतप्रधान मोदींनी लहानपणी चहा विक्री केलेलं रेल्वे स्थानक विकासित करण्याची कोणतीही योजना विचाराधीन नसल्याचं लोकसभेत स्पष्ट करण्यात आलंय. पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना याबाबतचा खुलासा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या लहानपणी गुजरातच्या वडनगर स्टेशनवर चहा विक्री करुन उदरनिर्वाह केला होता. या स्टेशनला पर्यटनाच्या दृष्टीने विकासित करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पर्यटनमंत्र्यांनी याबाबात स्पष्टीकरण दिलं.
सरकारची वडनगर स्टेशनचा विकास करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं सांगून महेश शर्मा म्हणाले की, असा कोणताही प्रस्ताव पर्यटना मंत्रालयाकडे आलेला नाही. त्यासाठी निधी देखील देण्यात आला नसल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, पर्यटन मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने वडनगर स्टेशनचा विकास करण्यात येईल, असं महेश शर्मा यांनी या महिन्याच्या पूर्वी स्पष्ट केलं होतं.
सध्या मोदींनी चहा विक्री केलेल दुकान त्याच प्लॅटफॉर्मवर अस्तित्वात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement