एक्स्प्लोर
Advertisement
पॅन कार्ड आता नव्या रुपात येणार!
नवी दिल्ली : बनावट पॅन कार्डच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी आता केंद्र सरकारने पॅन कार्ड नव्या रुपात देण्याचा निर्णय घेतला आहे. आयकर विभागाकडून नव्या स्वरुपातील पॅन कार्ड देणं सध्या सुरुही करण्यात आलं आहे, अशी माहिती आयकर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
नवे पॅन कार्ड एनएसडीएल आणि यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडून प्रिंट केले जाणार आहेत. या पॅन कार्डचं वितरण 1 जानेवारीपासून सुरु करण्यात आलं असून नवीन अर्ज करणाऱ्यांना यापुढे नवीन स्वरुपातील पॅन कार्ड मिळणार आहेत.
सरकारडून या नवीन पॅन कार्डमध्ये क्यूआर कोड म्हणजेच क्वीक रिस्पॉन्स कोडचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पॅन प्रणाली अधिक पारदर्शक होऊन गैरप्रकार थांबवता येतील, असा सरकारचा अंदाज आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशात दरवर्षी अडीच कोटी नागरिक पॅन कार्डसाठी अर्ज करतात.
जुलै 2016 मध्ये सरकारने पॅन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता आणली होती. शिवाय बनावट पॅन कार्ड ओळखण्यासाठी देखील आयकर विभागाने नवी व्यवस्था केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement