Karnataka Teacher Suspended : सिद्धरामय्या यांच्या सरकारवर टीका, शिक्षकाला गमवावी लागली नोकरी
Karnataka Teacher Suspended: कर्नाटकातील एका शिक्षकाने सिद्धरामैया यांच्या सरकारच्या मूल्यांवर काही प्रश्न उपस्थित केले. परंतु त्या शिक्षकाला हे प्रश्न विचारणं चांगलच महागात पडलं आहे.
Karnataka Teacher Suspended: कर्नाटकात (Karnataka) सिद्धरामय्या यांच्या सरकारच्या मूल्यांवर टीका करत एका शिक्षकाने काही प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडियावर या शिक्षकाने विचारलेले प्रश्न या शिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. तसेच या शिक्षकाने सिद्धरामय्या यांच्या काळातील सर्वाधिक कर्जाविषयी देखील प्रश्न उपस्थित केले. त्यांनंतर या शिक्षकावर कारवाई (Teacher Suspended) करत त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे.
कर्नाटकमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने या पोस्टमध्ये सरकारने केलेल्या आश्वासनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि या आश्वासनांमुळे राज्यावरील कर्जाचा भार वाढणार असल्याचा दावा देखील या शिक्षकाने या पोस्टमध्ये केला आहे. तसेच या शिक्षकाने आकडेवारीचा संदर्भ देत, कृष्णा यांच्या कार्यकाळापासून ते शेट्टार यांच्या कार्यकाळापर्यंत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या कर्जाचा आकडा जवळपास 71 कोटींपेक्षा जास्त आहे. परंतु सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात म्हणजेच 2013 ते 2018 पर्यंत दोन लाख 42 हजार कोटी रुपयांपर्यंत या कर्जाचे आकडे पोहोचले होते. त्यामुळे या शिक्षकाने स्पष्ट म्हटले की, सिद्धारामय्या यांच्या सरकारला अनेक घोषणा करणं सहज सोपं आहे.
शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले निलंबनाचे आदेश
तसेच शिक्षकाच्या या पोस्टनंतर शिक्षण अधिकारी एल.जयप्पा यांनी शनिवारी त्याच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. या आदेशामध्ये म्हटलं आहे की, "शनिवारी निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकाने शनिवारी सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मागील सरकारच्या काळातील कर्जाविषयी या शिक्षकाने उल्लेख केला करुन सरकारच्या नियमांचे उल्लंघन केले आहे."
अमित मालविया यांची टीका
या प्रकरणावर भाजपाचे अमित मालविया यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "खरंच सरकारवर टिका केली म्हणून एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे." "त्यांनी फक्त सिद्धरामय्या यांच्या काळात किती कर्ज झाले हे निदर्शनास आणून दिले होते," असं देखील अमित मालविया यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच अमित मालविया यांनी सरकारला खरं सहन नाही झालं का? असा सवाल देखील त्यांच्या ट्वीटमध्ये विचारला आहे.
A teacher of a state run lower primary school in Karnataka has been suspended for his FB posts criticising CM Siddaramaiah for his policies. He merely pointed out that latter could promise so many freebies because the state's debt always rose when he helmed the Govt.
— Amit Malviya (@amitmalviya) May 22, 2023
Truth hurt? pic.twitter.com/Q8FP4By5tW
महत्त्वाच्या इतर बातम्या :