Nashik Chhagan Bhujbal : सर्वात आधी माझ्यावर प्रयोग, त्यावेळी ईडीबाबत कुणालाच माहित नव्हतं, छगन भुजबळांची प्रतिक्रिया
Nashik Chhagan Bhujbal : ईडी आणि (ED) भारत सरकारच्या पोलीस यंत्रणा कशा प्रकारे वापरल्या जात आहे, हे सर्वाना माहीती आहे.
Nashik Chhagan Bhujbal : ईडी आणि (ED) भारत सरकारच्या पोलीस यंत्रणा कशाप्रकारे वापरल्या जात आहे हे सर्वांना माहिती आहे. सर्वात आधी माझ्यावर प्रयोग करण्यात आला. त्यावेळी ईडी काय सर्वांना माहिती नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने (High Court) सांगितले आहे, की भीती निर्माण करु नका. लोकशाही मार्गाने निषेध केला जात आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काही चुकीचे केले नाही, त्यांच्यावर कारवाई होणार नाही. भाजपाकडे (BJP) लॉंड्री आहे, त्यांच्याकडे जे येतात ते स्वच्छ करतात. यंत्रणांवर दबाव टाकण्याचा हेत नाही. आमच्या प्रांताध्यक्षांवर कारवाई होत असताना आम्ही गप्प बसयाचे का? असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज नाशिक (Nashik) शहरात होते, त्यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. तर महाविकास आघाडी जागा वाटपावर म्हणाले की, जागा वाटपावर कुठेही एकमत आणि चर्चा झाली नाही, नवनवीन आकडे समोर येतात आम्ही त्यावर एन्जॉय करतो. कुठल्या पक्षाची कोण व्यक्ती निवडून येणार तो निकष लावला जाणार असल्याचे भुजबळ म्हणाले. तर नोट बंदीवर भुजबळ म्हणाले की, नोटबंदी हा नेहमीचा खेळ आहे, कर्नाटकात निकाल लागला. त्यांनतर दोन हजारच्या नोटा बंद (Note Ban) केल्या जात आहेत. दुसरीकडे आठ वर्ष झाले नोट बंदी करुन किती काळा पैसा बाहेर आला, हे कळाले नाही, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी भुजबळांनी केली.
त्र्यंबकेश्वर मंदिर घटनेवर भुजबळ म्हणाले...
तर मागील आठवड्यात झालेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिर घटनेवर छगन भुजबळ म्हणाले की, त्र्यंबकेश्वरचे गावकरी, नगरपालिकेचे काही म्हणणं नाही. पुजारी लोक सांगतात की, शेकडो वर्षाची परंपरा आहे. देवाचे ऋण फेडण्यासाठी धूप दाखवतात, पूजा होते. याच मंदिरात एका चित्रपटाची शूटिंग झाली, या चित्रपटात अभिनेत्री म्हणून पार्वती खान काम करत होती. ही अभिनेत्री मंदिरात जाऊन चित्रीकरण करण्यात आले होते, मग आता असे का होते? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. मात्र हे सगळं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होत आहे, कितीही पेटवापेटवी करा, पण त्याचा उपयोग होणार नाही. 75 टक्के लोक तिथे जाणे थांबले, त्यामुळे सर्वांचे नुकसान झाले.
राजकारणात उलथापालथ सुरु
दरम्यान गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरु आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या तिघाडीचे राजकरण सुरु असल्याचे चित्र आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, दुसरी, तिसरी आघाडी माहिती नाही, पण भाजपच्या हुकूमशाही विरोधात सर्व पक्षांनी उभे राहिले पाहिजे. तर समीर वानखेडे यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक बापाचे हृदय पोरासाठी बोलत असते, शाहरुख खान मुलासाठी विनवणी करत होता. तुम्ही बरोबर काम केले नाही म्हणून तुमच्यावर कारवाई केली जात असल्याचे भुजबळ म्हणाले.