एक्स्प्लोर
Advertisement
सोनं पुन्हा महागलं, चार वर्षांतील नवा उच्चांक
मुंबई : जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि ब्रेक्झिटचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर पाहायला मिळत आहे. सोनं आणि चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.
सोन्याचा दर प्रति तोळा 32 हजार रुपयांवर पोहोचला आहे. मागील चार वर्षातील सोन्याच्या दरातील सर्वाधिक वाढ आहे. सोन्याला बुधवारी 31 हजार 953 रुपयांचा भाव मिळाला होता.
यंदा सोनं 33,500 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता
सोन्याच्या किमतींत 17 टक्के तर चांदीच्या दरात 28 टक्क्यांनी वाढ झाल्याचं कळतं. जागतिक बाजारपेठेत ही परिस्थिती कायम राहिल्यास येत्या एक-दोन महिन्यात सोन्याच्या किमतींमध्ये अशीच वाढ होऊ शकते, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.सोने 1700 तर चांदी 1400 रुपयांनी महाग
गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सोनं हा भारतीयांमध्ये एक चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे गेल्या काही महिन्यात सोन्याच्या खरेदीत वाढ झाल्याने या किमतींतही वाढ होता दिसत आहे.अवघ्या 1 मिनिटात गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचा फटका
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1360 डॉलर प्रति औंस (अंदाजे साडेतीन तोळे) स्तराला पोहोचलं आहे. जर सोन्याने 1400 डॉलर प्रति औसंचा स्तर ओलांडला तर भारतात हा दर 34,000 हजारांच्या घरात पोहोचेल, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement