एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पर्रीकरांबद्दल माहिती दिली नाही तर काँग्रेस कोर्टात जाणार
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या प्रकृतीविषयी प्रचंड गुप्तता पाळळी जात आहे. भाजप आघाडी सरकारने पर्रिकर यांच्या प्रकृती बद्दल नेमकी माहिती चार दिवसात दिली नाही तर काँग्रेस कोर्टात जाईल आणि कमिशनर नेमून चौकशी मागणी करील, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या प्रकृतीविषयी प्रचंड गुप्तता पाळळी जात आहे. भाजप आघाडी सरकारने पर्रिकर यांच्या प्रकृती बद्दल नेमकी माहिती चार दिवसात दिली नाही तर काँग्रेस कोर्टात जाईल आणि कमिशनर नेमून चौकशी मागणी करील, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी काल पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका घेतली. देशप्रभू म्हणाले, ‘पर्रीकर यांना दिल्लीच्या एम्स इस्पितळातून स्ट्रेचरवरुन गोव्यात आणले. ते पाहता त्यांच्या प्रकृतीविषयी सर्वांनाच संशय आहे. सरकारने त्यांच्या आरोग्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पर्रीकर जर खरोखरच सुस्थितीत असतील तर त्यांचा व्हिडिओ तरी जनतेसाठी प्रसारित करावा.’
मंत्री विश्वजित राणे यांनी पर्रीकरांच्या आरोग्याविषयी बोलण्याचा अधिकार हा त्यांच्या कुटुंबियांचाच असल्याचे जे विधान केले होते. त्याचाही देशप्रभू यांनी कडक शब्दात समाचार घेतला. पर्रीकर हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या प्रकृतीबाबतचे अधिकृत विधान सरकारकडून यायला हवे. त्यांच्या कुटुंबियांना हा अधिकार दिला कोणी?, असा सवाल त्यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पर्रीकर हे लवकरच कामावर रुजू होणार असल्याचे जे भाष्य केले होते त्यावरही देशप्रभू यांनी टीका केली. गेल्या मार्चपासून अशाच प्रकारची विधाने भाजपकडून येत आहेत. ही खोटारडेपणाची विधाने असून भाजप खोटारडेपणाचा महामेरु बनला आहे, अशीही टीका त्यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अधिकारांचा गैरवापर करीत आहेत, असा आरोप करुन देशप्रभू म्हणाले की, विविध खात्याचे संचालक तसेच अधिकाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी आदेश काढले जातात. ज्या खात्यांमधून आदेश काढले गेलेले आहेत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सहीचा नोट खात्याकडे पोचला होता की त्यांचे नाव घेऊन मधल्यामध्ये आणखी कुणी घपला करीत आहेत, हे स्पष्ट व्हायला हवे, असे देशप्रभू म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement