एक्स्प्लोर

महादेव मुंडेंना मारुन टेबलावर हाडं, कातडं ठेवली; बाळा बांगरांच्या आरोपानंतर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

आपण यासंदर्भातील सर्व पुरावे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधिक्षकाकडे देणार असल्याचं देखील बांगर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. यावरूनच ज्ञानेश्वरी मुंडेंनी पहिली प्रतिक्रीया दिलीय.

Beed:  'संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडने माझ्यासमोर तिघांना मारलं .मी साक्षीदार आहे .महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवर त्याचा हाड, कातडं आणि रक्त आणून ठेवलं होतं .संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी तुला सरपंचाच्या खुनात अडकवणार अशी धमकी वाल्मिक कराडने दिली होती, असा आरोप वाल्मीक कराडचा जुना सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर यांनी आज पत्रकार परिषदेत केला होता . यावरूनच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बांगर यांचा जबाब घेत आरोपींना अटक करावी .कारण त्यांना आरोपी माहीत आहेत . अशी मागणी पोलीस अधीक्षकांना केली आहे .

काय म्हणाल्या ज्ञानेश्वरी मुंडे ?

बीडच्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मोठा खुलासा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला होता यानंतर आता यावर परळीतील मृत व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बांगर यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करण्यात यावी कारण त्यांना आरोपी माहीत आहेत आणि त्यांची फिर्याद देखील घ्यावी.अशी माझी एस पी साहेबांना विनंती आहे त्याचबरोबर एसपी साहेबांना देखील आरोपी निष्पन्न झाले आहेत,पण ते आरोपीची पाठराखण का करत आहेत? तत्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांचे देखील चौकशी करावी.

या प्रकरणाची चौकशी केज येथील पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आलीय. मात्र, ते भेटायला देखील आले नाहीत. याबाबतीत आंदोलन उपोषण केले. मात्र, अद्याप आम्हाला न्याय नाही. काल बांगर यांनी आरोपीचे नाव घेऊन टेबलवर मांस ठेवल्याचे सांगितले.तरी देखील एसपी आणखी शांत का आहेत? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे हे तपासले पाहिजे. सानप यांचे सीडीआर काढले पाहिजेत. एसपी सरांनी यात कुणाचा दबाव आहे का ते सांगावे. नाहीतर केस बंद करून टाकावी. या प्रकरणात प्रशासन दुर्लक्ष करत आहे हे दिसून येतय. आरोपीची पाठराखण का केली जात आहे ,हे तपासले पाहिजे.

नेमकं काय म्हणाले बांगर? 

वाल्मीक कराडचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर हे त्याच्यापासून दूर झाल्यानंतर वाल्मीकने माझ्यासोबत काम कर असा हट्ट धरला होता. मात्र विजयसिंह बांगर यांनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता, त्यामुळे त्या दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती. यानंतर काल (बुधवारी) विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच तुला एका सरपंचाच्या खुनामध्ये अडकवणार अशी वाल्मिकने  फोनवरून मला धमकी दिली होती ,असा दावा बांगर यांनी केला आहे. महादेव मुंडे यांना मारल्यानंतर वाल्मीक कराडच्या टेबलावर त्यांचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. यानंतर वाल्मीक कराडने मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट दिल्या, असा गौप्यस्फोट विजयसिंह बांगर यांनी केला आहे.

संबंधित बातमी:

Walmik Karad: मी वाल्मिक कराडच्या टेबलवर महादेव मुंडेंच्या शरीरावरील कातडं अन् हाडं पाहिलेत, जुन्या साथीदाराचा खळबळजनक आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar : भोंदू राजेंद्र गडगे याचा 'दत्तधाम दरबार' सील, पोलिसांकडून स्पॉट पंचनामा, अनेक औषधे ताब्यात
भोंदू राजेंद्र गडगे याचा 'दत्तधाम दरबार' सील, पोलिसांकडून स्पॉट पंचनामा, अनेक औषधे ताब्यात
Latur : लातूर हादरले, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
लातूर हादरले, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
Pimpri-Chinchwad: व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
Dharashiv Crime News : शिवीगाळीचे रूपांतर भांडणात झालं अन्...; जमिनीच्या वादातून चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काढला काटा, धाराशिवमध्ये खळबळ
शिवीगाळीचे रूपांतर भांडणात झालं अन्...; जमिनीच्या वादातून चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काढला काटा, धाराशिवमध्ये खळबळ

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Embed widget