Personal Loan : तुमच्या 'आधारकार्ड'च्या मदतीने मिळवा झटपट पर्सनल लोन, काय आहे प्रोसेस?
आधार कार्डच्या मदतीने, तुम्हाला त्वरित पर्सनल लोन मिळते, ज्यासाठी तुम्ही घरून ऑनलाईन अर्ज करू शकता.
मुंबई : कर्ज घेणे सध्याच्या काळात पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे. जर तुम्ही कर्जासाठी पात्र असाल तर तुम्हाला आता जास्त कागदपत्रांची जमवाजमव करावी लागणार नाही. तुम्हाला केवळ KYC कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील आणि त्यामुळे बँकेला सर्व तपशील मिळतील. आपण आधार कार्डद्वारे पर्सनल लोनसाठी अर्ज देखील करू शकता.
आधार कार्डच्या मदतीने, तुम्हाला त्वरित पर्सनल लोन मिळते, ज्यासाठी तुम्ही घरून ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला अर्ज भरावा लागेल आणि ई-केवायसी कागदपत्रे द्यावे लागतील. आपल्याला कोणत्याही कागदपत्रांची हार्ड कॉपी सबमिट करण्याची आवश्यकता नाही. आधार कार्डच्या आधारे ही कागदपत्रे सहज उपलब्ध होतील.
कर्ज मिळवण्यासाठी काय कराल?
- सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या मोबाईल अॅप किंवा वेबसाइटवर लॉग इन करा.
- येथे तुम्हाला कर्जाचा पर्याय मिळेल. तुम्हाला पर्सनल लोनचा पर्याय निवडावा लागेल आणि त्यावर क्लिक करून पात्रता तपासावी लागेल. नंतर Apply Now वर क्लिक करा.
- यानंतर, अर्ज भरून, तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल जसं की एम्प्लॉयमेंट आणि पर्सनल डिटेल्स भरावे लागतील.
- त्यानंतर तुम्हाला बँकेकडून कॉल येईल जो तुमचे डिटेल्स आणि पात्रता पडताळणीसाठी असेल. पडताळणीनंतर तुमचे कर्ज मंजूर होईल.
- कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.
नियम आणि अटी
कर्ज घेण्यासाठी तुमचे वय 23 वर्षे असणे आवश्यक आहे. आपल्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे आणि आपल्याकडे सार्वजनिक, खाजगी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी असणे आवश्यक आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर योग्य असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे किमान उत्पन्न दाखवले पाहिजे.
इतर बातम्या