एक्स्प्लोर

गँगरेप प्रकरणी अखिलेश सरकारमधील मंत्री गायत्री प्रजापती अटकेत

लखनौ : समाजवादी पक्षाचे नेते आणि अखिलेश सरकारमधील मंत्री गायत्री प्रजापती यांना गँगरेप प्रकरणी अटक झाली आहे. लखनौमधून प्रजापती यांना अटक केल्याची माहिती उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक जावेद अहमद यांनी दिली. गायत्री प्रजापती यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अखिलेश सरकारमध्ये मंत्री राहिलेले गायत्री प्रजापती आणि इतर सहा जणांवर एका महिलेवर गँगरेप केल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गायत्री प्रजापती फरार होता. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक जावेद अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री प्रजापती फरार असताना काही दिवस दिल्लीजवळ, तर त्यानंतर काही दिवस हरियाणाजवळ राहत होते. लखनौहून आज सकाळीच प्रजापती यांना अटक करण्यात आली. गँगरेप प्रकरणात प्रजापती यांच्यासोबत आरोपी असलेले अमरेंद्र उर्फ पिंटू, रुपेश्वर आणि विकास वर्मा यांना लखनौमधील हजरतगंज परिसरातून 14 मार्चला अटक करण्यात आली होती. या गँगरेप प्रकरणात गायत्री प्रजापती यांचे गनर चंद्रपाल, लेखापाल अशोक तिवारी आणि आरोपी आशिष शुक्ला यांनाही याआधी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. सहा महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने गायत्री प्रजापती यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय दिला होता. शिवाय, सुप्रीम कोर्टाने प्रजापती यांची याचिकाही फेटाळली होती. या याचिकेतून प्रजापती यांनी अटकेतून सुटका मिळावी, अशी मागणी केली होती. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित शाह म्हणाले होते, सरकार आल्यावर सर्वात आधी गायत्री प्रजापतीला तुरुंगात पाठवू. प्रकरण काय आहे? गायत्री प्रजापती यांच्यावर गँगरेपचा आरोप करण्यात आल्यानंतर पोलिसांनी 17 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली, तीही सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर. धक्कादायक म्हणजे गँगरेपची तक्रार दाखल झाल्यानंतरही 27 फेब्रुवारीला अमेठीमधील मतदारसंघात फिरताना दिसला होता. मात्र, पोलिस सांगत होते की, प्रजापती फरार आहे. पीडित महिलेवर गँगरेप केल्यानंतर, तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न प्रजापती आणि इतर आरोपींनी केला होता. समाजवादी पक्षाच्या तिकिटावर अमेठीमधून लढले होते. मात्र, ते पराभूत झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget