Gautam Adani : अदानी कुटुंबाचं कौतुकास्पद पाऊल! सामाजिक कार्यासाठी तब्बल 60,000 कोटींची देणगी
Gautam Adani donates 60k crores : गौतम अदानी यांनी अदानी फाऊंडेशनद्वारे सामाजिक उपक्रमांसाठी 60,000 कोटी रूपयांची देणगी जाहीर केली आहे.
Gautam Adani donates 60k crores : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. गौतम अदानी यांनी त्यांचे वडील शांतीलाल अदानी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त तसेच गौतम अदानी यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांसाठी 60,000 कोटी रूपयांची देणगी देण्याचे वचन जाहीर केले आहे. अदानी फाऊंडेशनद्वारे हा निधी देण्यात येणार आहे. अदानी कुटुंबाच्या या निर्णयाने समाजातील सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
या संदर्भात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की," प्रेरणादायी अशा माझ्या वडिलांच्या 100 व्या जयंतीबरोबरच चालू वर्ष हे माझ्या 60 व्या वाढदिवसाचे वर्षदेखील आहे. आणि म्हणूनच माझ्या कुटुंबाने 60,000 कोटी रक्कम ही आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित असा धर्मादाय उपक्रमांसाठी विशेषत: देशाच्या ग्रामीण भागासाठी विनियोग करण्यासाठी जाहीर केली आहे."
अदानी कुटुंबाच्या या योगदानामुळे त्यांच्या 'ग्रोथ विथ गुडनेस' या तत्वज्ञानाची पूर्तता करण्यासठी अदानी फाऊंडेशनच्या आजवरच्या प्रवासात बदल घडवून आणण्याची उत्कट इच्छा असलेल्या काही उज्ज्वल असे मन आकर्षित करण्याचा आमचा मानस आहे. असेही ते म्हणाले. आतापर्यंत भारतातील 16 राज्यांमधील 2,409 गावांमधील 37 लाख सहभागी या उपक्रमांमध्ये आहेत. गौतम अदानी यांनी जाहीर केलेला निधी समाजातील गरजू लोकांसाठी महत्वाचा ठरणार आहे. यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागणार आहे.
गौतम अदानी यांच्याबद्दल :
अहमदाबाद येथे मुख्यालय असलेला अदानी समूह हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात वेगाने वृद्धिंगत होत असलेला विविध क्षेत्रात कार्यरत असलेला समूह आहे. अदानी समूह हा लॉजिस्टिकस (बंदरे, विमानतळ, जहाज वाहतूक आणि रेलवे). तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती, वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण, अपारंपरिक ऊर्जा, नैसर्गिक वायू वितरण, पायाभूत सुविधा, कृषी (कमोडिटीज, खाद्य तेल, खाद्य पदार्थ, शीतगृहे, धान्य गोदामे), रिअल इस्टेट, सार्वजनिक वाहतूक क्षेत्राला लागणाऱ्या पायाभूत सुविधा, संरक्षण आणि एरोस्पेस आणि अन्य क्षेत्रात कार्यरत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Political Crisis : मोठी घडामोड; गुवाहाटीमध्ये शिवसेना आमदार असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे जोरदार आंदोलन
- Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्या, देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
- Covid-19 Symptoms in Kids : कोरोनातून बरे झाल्यानंतरही मुलांमध्ये लक्षणे? अभ्यासातून धक्कादायक बाब समोर