एक्स्प्लोर
मोदी म्हणतात तसं, गटार ते शेगडी गॅसचा प्रवास शक्य आहे?
खरंच निव्वळ गटारावर एखादं पात्र उपडं टाकून त्यातून नळी काढून थेट गॅस बर्नरला लावल्याने चहावाल्यांचं काम भागेल? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
मुंबई : वर्ल्ड बायोफ्युल डेच्या निमित्ताने एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहावाल्याने गटारीतून कसा गॅस तयार केला याचं उदाहरण दिलं. हे अशक्य आहे असं नाही.. पण खरंच निव्वळ गटारावर एखादं पात्र उपडं टाकून त्यातून नळी काढून थेट गॅस बर्नरला लावल्याने चहावाल्यांचं काम भागेल? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
एलपीजी गॅस तयार करण्याची एक प्रक्रिया आहे. तो अचानक नाल्यातून पाईप काढून बर्नरला चिटकवल्यानं कसा तयार होईल? म्हणून आम्ही काही तज्ञांना गाठलं आणि मोदी जे म्हणतात ते शक्य आहे का? हे विचारलं.
एलपीजी तयार कसा होतो ते बघा..
एलपीजी क्रूड ऑईलपासून पेट्रोल बनवणाऱ्या रिफायनरीजमध्ये मिळतो. किंवा, जमिनीखाली असलेल्या क्रूड ऑईल आणि गॅसच्या साठ्यांपासूनही मिळवता येतो.
ब्यूटेन आणि प्रॉपेन ही वेगवेगळी रासायनिक संयुगं असली तरी त्यांचे गुणधर्म समान आहेत. ब्युटेन आणि प्रॉपेनची एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया होत नाही.
ब्यूटेन आणि प्रॉपेन यांच्या मिश्रणावर आवश्यक दाब देऊन त्याचं रूपांतर द्रवात केलं जातं. गॅस सिलिंडर हे स्टीलचं बनवतात, कारण खूप दाब सहन करण्याची क्षमता स्टील सिलिंडरमध्ये असते.
गॅस संपूर्ण भरून सील केलेल्या सिलिंडरचं वजन 32.75 किलोग्रॅम असतं. त्यात असलेल्या गॅसचं वजन 14.2 किलोग्रॅम असतं.
गॅसची चावी ऑन केल्याने दाब थोडा कमी होऊन द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होतं, त्यानंतर गॅस रबरी नळीतून गॅसच्या बर्नरकडे येऊ लागतो.
एवढी सगळी प्रक्रिया फक्त नाल्यावर एखादं पात्र उपडं टाकून त्याच्यातून पाईप बाहेर काढून गॅसची ज्योत जळू शकते का? हा प्रश्न आहे. तसा प्रयोग चहावाले करु शकतील का?
विरोधकांना टीकेची आयती संधी
मोदींनी उदाहरण देताना एका पेपरात वाचलं, असं सांगितलं. पण त्यावरुन आता विरोधकांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही टीका करण्यासाठी हाच मुद्दा उचलला.
मोदींचा हा किस्सा जाम व्हायरल झाला. त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विटरवरुन निशाणा साधला. अशी वक्तव्य होऊ नये, म्हणून “म्हणतात की देशाचा पंतप्रधान शिकला-सवरलेला असला पाहिजे”, असं केजरीवाल म्हणाले.
अगदीच असे प्रयोग करणारे अवलिये भारतात नाहीत, असं नाही. पण गॅस बनवण्याची प्रक्रिया किचकट आहे. इतक्या सोप्या पद्धतीने इंधनाचं काम भागत असतं तर चहावाल्यांनी गॅस सिलेंडरवर पैसे कशाला खर्च केले असते? त्यामुळे भाई बेचो.. कुछ भी बेचो.. बस थोडा संभाल के.. !
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement