एक्स्प्लोर

G20 Summit: G20 मध्ये आफ्रिकन युनियनचाही समावेश; पंतप्रधान मोदींकडून 'सबका साथ सबका विकास'चा नारा

G20 Summit: जी 20 मध्ये युरोपियन युनियनचा समावेश आधीपासून आहे. आता आफ्रिकन युनियन पण समाविष्ट होईल. ही शिखर परिषद सुरु होण्याआधीपासूनच पंतप्रधान मोदी आफ्रिकन युनियनच्या समावेशाबद्दल किती आग्रही आहेत हे दिसत होतं.

G20 Summit: जी 20 शिखर परिषदेला (G20 Summit) आजपासून राजधानी दिल्लीत सुरुवात झाली आहे. या शक्तीशाली आंतरराष्ट्रीय समुहाचं यजमानपद हे भारतासाठी अभिमानास्पद आहे. आज या बैठकीच्या निमित्तानं एक ऐतिहासिक घोषणाही झाली. जी 20 आता लवकरच जी 21 म्हणून ओळखला जाणार का...? ज्या घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष होतं ती महत्वाची घोषणा अखेर भारतात झाली आणि तीदेखील यजमान असलेल्या भारताच्या पंतप्रधानांकडूनच (PM Modi) करण्यात आली. आफ्रिकन युनियन हाही आता जी 20 परिषदेचा कायमचा सदस्य असेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. 55 राष्ट्रांचा समूह असलेल्या आफ्रिकन युनियनचा समावेश हे या बैठकीचं सर्वात ठळक वैशिष्ट्य असेल. पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सन्मानानं आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना बैठकीत समाविष्ट केलं.

जी 20 मध्ये युरोपियन युनियनचा समावेश आधीपासून आहे. आता आफ्रिकन युनियन पण समाविष्ट होईल. ही शिखर परिषद सुरु होण्याआधीपासूनच पंतप्रधान मोदी आफ्रिकन युनियनच्या समावेशाबद्दल किती आग्रही आहेत हे दिसत होतं. जागतिक राजकारणात ज्यांनी आपला आवाज ऐकला जात नाही, असं वाटतं, त्यांना सोबत घेण्याची गरज आहे, असं ते म्हणत होते. सबका साथ सबका विकास या देशात वापरल्या जाणाऱ्या संकल्पनेलाही त्यांनी या महत्वपूर्ण पावलाशी जोडल्याचं दिसून आलं. 

पाठीमागे कोणार्कमधल्या सूर्यमंदिराची भव्य प्रतिमा आणि त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे जी 20 परिषदेतल्या एकेक राष्ट्रप्रमुखाचं स्वागत करतायत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी गळाभेट, सौदी अरेबियाच्या राजपुत्रांना अलिंगन तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी खास केमिस्ट्री...बाकी कुणाला नाही पण बायडन यांना तर कोणार्कच्या सूर्यमंदिराचा हा कालचक्र काय आहे, त्याचं महत्व काय हेही सांगताना ते दिसले. 

जी 20 मध्ये मोदींच्या 15 द्विपक्षीय बैठकांकडेही लक्ष 

  • या बैठकीच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी 3 दिवसांत 15 द्विपक्षीय चर्चा करणार आहेत
  • त्यातही अमेरिका, सौदी अरेबियासोबतच्या त्यांच्या बैठकांकडे सगळ्यांचं लक्ष असेल 
  • अमेरिकेसोबत जेट इंजिनची भारतात निर्मिती करण्यासंदर्भात आणि मिलिट्री ड्रोन खरेदी करण्यासंदर्भात काही महत्वाचे करार होतात का याकडे लक्ष 
  • भारत- अमेरिका- सौदी अरेबिया यांच्यात युरोप मिडल इस्ट आणि भारत रेल्वे आणि बंदर मार्गानं जोडण्याबाबतही काही महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

बैठक संपल्यानंतर जे संयुक्त निवेदन सादर केलं जातं. त्यात युक्रेन युद्दाबद्दलचा उल्लेख असणार का याचीही चर्चा आहे. तूर्तास याबद्दलचा पॅराग्राफ रिक्त ठेवला गेला आहे. शब्दांची निवड काय असावी याबाबत काथ्याकूट सुरु आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थिती नाहीय. युक्रेन युद्धापासून पुतिन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाणं टाळतायत. पण चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थितीचं कारण काय ते समजू शकले नाहीय. 

दरम्यान, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर...अर्थात वसुधैव कुटुंबकम ही या शिखर परिषदेची थीम आहे. आज राष्ट्रपतींनी जी 20 राष्ट्रप्रमुखांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे, त्यावरुन मात्र राजकारण होताना दिसते आहे. राज्यसभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रण नाही. त्यामुळे काँग्रेसचे तीन राज्यांमधले मुख्यमंत्रीही यावर बहिष्कार टाकणार अशी चर्चा आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आता G 20 नव्हे G 21, उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी काय म्हणाले...?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले

व्हिडीओ

Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Embed widget