एक्स्प्लोर

सियाचीनमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या लेफ्टनंट जनरल पीएन हून यांचं निधन

पीएन हून यांच्या नेतृत्त्वात भारतीय सैन्याने जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनमध्ये तिरंगा फडकावला होता.

चंदीगड : सियाचीनमध्ये 'ऑपरेशन मेघदूत'चं नेतृत्त्व करणारे लेफ्टनंट जनरल पीएन हून यांचं निधन झालं. चंदीगडमध्ये सोमवारी (6 जानेवारी) संध्याकाळी वयाच्या 91 व्या वर्षी पीएन हून अर्थात प्रेम नाथ हून यांनी अखेरचा श्वास घेतला. लेफ्टिनेंट जनरल पीएन हून यांच्यावर दोन दिवसांपासून पंचकुलाच्या कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी 6 जानेवारी संध्याकाळी 5.30 वाजता त्यांना मृत घोषित केलं. 1984 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात पीएन हून यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. पीएन हून यांच्या नेतृत्त्वात भारतीय सैन्याने जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनमध्ये तिरंगा फडकावला होता. पीएन हून यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1929 रोजी पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये झाला होता. परंतु फाळणीच्या वेळी त्यांचं कुटुंब भारतात आलं. 1987 मध्ये पश्चिम कमांडे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले होते. यानंतर 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काय आहे ऑपरेशन मेघदूत? भारताची गुप्तचर यंत्रणा रॉकडून माहिती मिळाली होती की, 17 एप्रिल 1984 रोजी पाकिस्तानी सैन्य सियाचीन ग्लेशिअरवर ताबा मिळवण्यासाठी चढाई करणार आहे. जर पाकिस्तानने सियाचीनवर ताबा मिळवला तर पाकला पराभूत करण्यासाठी भारतीय सैन्याला जास्त मेहनत घ्यावी लागेल. ही माहिती मिळताच भारतीय सैन्य अलर्ट झालं. यानंतर 13 एप्रिल 1984 रोजी भारतीय सैन्याने सियाचीनमध्ये 'ऑपरेशन मेघदूत' लॉन्च केलं. विशेष बाब म्हणजे बर्फात घातले जाणारे कपडे आणि काही मोजक्या उपकरणांसह ते 12 एप्रिलच्या रात्रीच भारतीय सैन्याजवळ पोहोचले होते. जगातील सर्वात उंच युद्धभूमीतील संघर्षाची ही पहिलीच घटना होती. याला 'ऑपरेशन मेघदूत' नाव देण्यात आलं होतं. या ऑपरेशनने भारताच्या सामरिक विजयाचा पाया रचला होता. सियाचीन भौगोलिक स्थिती अशी आहे की, भारताच्या दिशेला सियाचीनचा उभा चढ आहे, यामुळे ऑपरेशन मेघदूत अतिशय कठीण होतं. तर पाकिस्तानच्या बाजूची उंची फार कमी आहे. अशा परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला. त्यामुळे जगभरातील यशस्वी लढायांमध्ये 'ऑपरेशन मेघदूत'चाही समावेश होतो. हे एक वेगळंच युद्ध होतं, ज्यात भारतीय सैन्याने उणे  60 पासून उणे 70 अंश सेल्सिअस तापमानात सर्वात उंच युद्धभूमीवर जाऊन विजय मिळवला होता. तर पाकिस्तानसाठी हा लाजिरवाणा पराभव होता.

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget