एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रघुराम राजन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमाला जाणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर रघुराम राजन हे शिकागोमध्ये कार्यरत आहेत.
मुंबई : विश्व हिंदू परिषदेनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना आमंत्रण धाडलं आहे. विश्व हिंदू परिषदेची शाखा असलेल्या वर्ल्ड हिंदू ऑर्गनायझेशन या संस्थेनं शिकागोमध्ये आयोजित केलेल्या 3 दिवसांच्या अधिवेशनात राजन यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
रघुराम राजन यांनी विश्व हिंदू परिषदेचं आमंत्रण स्वीकारले आहे की नाही, यासंदर्भात अद्याप माहिती कळली नाही. मात्र राजन यांना आर्थिक विषयावरील व्याख्यानासाठी बोलावण्यात आले आहे.
विश्व विश्व हिंदू परिषदेच्या वर्ल्ड हिंदू ऑर्गनायझेशनने शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रसिद्ध भाषणांची 125 वा वर्धापनदिनानिमित्त अधिवेशन आयोजित केले आहे. यात 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी आर्थिक धोरणांवरील सत्र आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर रघुराम राजन हे शिकागोमध्ये कार्यरत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदेचं आमंत्रण रघुराम राजन यांनी फेटाळले नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement