Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती स्थिर, AIIMS प्रशासनाची माहिती
प्रकृत्ती अस्वस्थ वाटत असल्याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Former PM Manmohan Singh) यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती सध्या स्थिर असल्याची माहिती एम्सच्या ((AIIMS) प्रशासनाने दिली आहे. ताप आल्याने आणि प्रकृत्ती अस्वस्थ वाटत असल्याने डॉ. मनमोहन सिंह (89) यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी दिवसभरात काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय आणि काही महत्वाच्या नेत्यांनी दिल्लीतील एम्सला भेट दिली आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्या तब्बेतीची चौकशी केली.
Delhi | Congress leader Rahul Gandhi also met with former prime minister Dr. Manmohan Singh's wife, Gursharan Kaur, during his visit to AIIMS to enquire about the health of the former prime minister who has been admitted at the hospital since yesterday pic.twitter.com/LNHzqsaNAn
— ANI (@ANI) October 14, 2021
मनमोहन सिंह यांना या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 19 एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आलं. माजी पंतप्रधानांनी 4 मार्च आणि 3 एप्रिल रोजी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते.
मनमोहन सिंग 88 वर्षांचे आहेत आणि ते साखरेच्या आजारानेही त्रस्त आहेत. माजी पंतप्रधान सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया 1990 मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली. तर 2009 मध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये करण्यात आली. गेल्या वर्षी, एका नवीन औषधामुळे रिअॅक्शन आणि ताप आल्यानंतरही मनमोहन सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कित्येक दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Manmohan Singh Hospitalised: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली; AIIMS मध्ये दाखल
- Corona Crisis: लसीकरणाच्या संख्येपेक्षा टक्केवारीवर लक्ष केंद्रीत करा, मनमोहन सिंहांचं पंतप्रधान मोदींना पत्र
- Corona | माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंहांनी मोदी सरकारला केलेल्या कोरोनासंबंधीच्या पाच सूचना काय सांगतात?