Delta Plus :डेल्टा पल्स हा चिंतेचा विषय : डॉ. रमण गंगाखेडकर
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट विषयी जगभरातील इशारा दिला असून जलदगतीने लसीकरणाची मोहिम राबविण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट हा चिंतेचा विषय आहे. तोपर्यंत भारतात आतापर्यंत डेल्टाचे 51 केस समोर आल्या आहेत. दरम्यान आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिक रमन गंगाखेडकर यांनी सांगितले की, डेल्टा वेरिएंट हा चिंतेचा विषय आहे.
गंगाखेडकर म्हणाले, डेल्टा व्हेरिएंट सेल टू सेल ट्रान्सफर होऊ शकते. हा व्हेरिएंट शरीराला इजा पोहचू शकतो. डेल्टा व्हेरिएंट पॅथोफिजियोलॉजिकल बदलाचे कारण बनत आहे.कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आता म्युटेट होऊन डेल्टा प्लस तयार झाला आहे. या अगोदर सिंगल व्हेरिएंट आढळून आला होता. तेल्हा तो अगोदरपेक्षा दुप्पट वेगाने जास्त पसरत आहे
जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने पत्रकार परिषदेमध्ये करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचं गांभीर्य सांगितले आहे. पहिल्यांदा भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे जगातल्या जवळपास 85 देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या कोरोना व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे. कोरोना संदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे.
कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस प्रकार काय आहे?
कोरोनाचा नवीन डेल्टा प्रकार म्हणजेच B.1.617.2 प्रथम भारतात आढळला. आता हळूहळू इतरही अनेक देशांमध्ये त्याची प्रकरणे चर्चेत येत आहेत. कोरोना विषाणूच्या स्वरूपात बदलांमुळे, डेल्टा प्लस प्रकार तयार झाला आहे. हा विषाणू प्रथम युरोपमध्ये आढळला होता. स्पाइक प्रोटीन हा कोरोना विषाणूचा मुख्य भाग आहे. ज्याच्या मदतीने हा विषाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करून संसर्ग पसरवतो.
जलद गतीने पसरतोय डेल्टा प्लस व्हेरियंट
कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटमध्ये सर्वात धोकादायक गोष्टी म्हणजे तो आतापर्यंतच्या सर्व प्रकारांमध्ये सर्वात वेगवान पसरत आहे. अल्फा प्रकारही वेगवान पसरत असला तरी, डेल्टा प्रकार 60 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. डेल्टा प्रमाणेच कप्प्या व्हेरियंटही लसीला चकवा देण्यात यशस्वी झाला आहे. मात्र, हा प्रकार फारसा पसरला नाही. पण, आता सुपर-स्प्रेडर डेल्टा व्हेरियंटने लोकांना घाबरवले आहे.
कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट कसा टाळता येईल?
- घराबाहेर पडताना दुहेरी मास्क घाला.
- आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडा.
- 20 सेकंद तरी साबणाने आपले हात स्वच्छ धुवा.
- सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, लोकांपासून 6 फूट अंतर ठेवा.
- घरातल्या आणि आसपासच्या वस्तू स्वच्छ ठेवा आणि निर्जंतुकीकरण ठेवा.
- बाहेरून सामान आणल्यास निर्जंतुकीकरण करा आणि त्वरित स्पर्श करू नका.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
