Forbes: अदानींची अंबानी अन् झुकरबर्गला धोबीपछाड! मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Gautam Adani is Richest Man: गौतम अदानींनी जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतही आपले स्थान पक्क केलं असून संपत्तीच्या बाबतीत त्यांनी मार्क झुकरबर्गलाही मागे टाकलं आहे.
![Forbes: अदानींची अंबानी अन् झुकरबर्गला धोबीपछाड! मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Forbes Real Time Billionaire Index Gautam Adani is the richest man in Asia surpassing Mukesh Ambani Forbes: अदानींची अंबानी अन् झुकरबर्गला धोबीपछाड! मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/7374b48298901bda7841345186aacacf_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gautam Adani is Richest Man: एकीकडे गेल्या दोन वर्षापासून असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे भारतातील जवळपास 84 टक्के लोकांच्या उत्पन्नात घट झाली असली तरी दुसरीकडे मात्र अदानी आणि अंबांनीच्या संपत्तीत मोठी वाढ होत आहे. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) यांनी संपत्तीच्या बाबतीत आता रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याच्या मान मिळवला आहे. तसेच त्यांनी जगातल्या टॉप टेन श्रीमंतांच्या यादीतही आपलं स्थान पक्कं केलं आहे.
फोर्ब्जने रिअल टाईम बिलेनियर इंडेक्स (Forbes Real Time Billionaire Index) जारी केला असून त्यामध्ये गौतम अदानी यांची संपत्ती ही 90.1 अब्ज डॉलर इतकी असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर रिलायन्सच्या मुकेश अंबानींची संपत्ती ही 89.4 अब्ज डॉलर इतकी असल्याचं नमूद केलं आहे. संपत्तीच्या बाबतीत गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांनाच नव्हे तर मेटाच्या मार्क झुकरबर्गलाही (Mark Zuckerberg) मागे टाकलं आहे.
जगातल्या सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत टेस्लाच्या इलॉन मस्क यांने आपले पहिले स्थान कायम ठेवलं आहे. इलॉन मस्कची संपत्ती ही 232.3 अब्ज डॉलर इतकी आहे.
मुकेश अंबानी यांची संपत्ती एकाच दिवसात 2.2 अब्ज डॉलरने घटल्याने त्यांचे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थानही घसरले. तर त्याच वेळी गौतम अदानींच्या संपत्तीत 672 मिलियन डॉलरची घसरण झाली होती. शेअर मार्केटमधील रोजच्या चढ-उताराचा परिणाम हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीवर होत असल्याचं दिसून येतंय.
सौदी अरबच्या अरामको सोबतची डील रद्द झाल्याचा रिलायन्सला फटका
सौदी अरबच्या अरामको या कंपनीसोबत रिलायन्सची एक मोठी डील होणार होती. पण ही डील गेल्या वर्षी रद्द झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रिच्या महसुलात मोठी घट झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
- CNG अलॉटमेन्टमध्ये इंडियन ऑईल आणि अदानी ग्रुपची बाजी, महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना अदानी पुरवणार CNG
- Adani VS Ambani : 2020 साली अंबानींचा जलवा तर 2021 मध्ये अदानींची सरशी; अंबानी-अदानींच्या लढाईत 2022 मध्ये बाजी कुणाची?
- Forbes List : कोरोना काळात अब्जाधीशांच्या संपत्तीत 50 टक्क्यांची वाढ, मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)