एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परदेशात गेल्यावर कागदपत्र हरवल्यास काय कराल?
मुंबई : तुम्ही कधी बिझिनेस ट्रिप किंवा हॉलिडेच्या हेतून परदेशात गेला असाल आणि तुमची महत्त्वाची कागदपत्र म्हणजे पासपोर्ट, क्रेडिट कार्ड हरवल्यास, तुम्ही संकटात याल. अशावेळी तुम्ही काय करायला हवं, याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत...
पासपोर्ट हरवल्यास काय कराल?
परदेशात पासपोर्ट हरवल्यास सर्वात आधी तेथील स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल करा. त्यानंतर त्या देशातील भारतीय दूतावासाशी संपर्क करुन तुमची तक्रार नोंदवा. यासाठी ज्या देशात जाणार आहात, त्या देशातील भारतीय दूतावासाचा संपर्क क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती तुमच्याकडे घेऊन ठेवा. जेणेकरुन संकटकाळी उपयोगी येईल. भारतीय दूतावास तुम्हाला टेम्पररी पासपोर्ट देईल.
क्रेडिट कार्ड हरवल्यास काय?
परदेशात असताना क्रेडिट कार्ड हरवल्यास सर्वात आधी ज्या बँकेचं क्रेडिट कार्ड आहे, त्या बँकेला फोन करुन कार्ड ब्लॉक करा. विझा कार्डचा ग्लोबल हेल्पलाईन नंबर www.visa.co.in/ personal/benefits/lostyour card.shtml इथून मिळू शकतो.
परदेशात सामान हरवल्यास काय कराल?
विमानतळावर तुमचा सामान हरवल्यास, एअरलाईनच्या हेल्प डेस्कशी संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवा. तुमच्याकडे ट्रॅव्हल इंश्योरन्स असल्यास तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल.
परदेशात विम्याचे कागदपत्र हरवल्यास काय कराल?
परदेश दौऱ्यावर असताना तुमचे विम्याची कोणतीही कागदपत्र हरवल्यास, सर्वात आधी विमा कंपनीच्या वेबसाईटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करा किंवा ज्या देशात तुम्ही आहात, त्या देशातील विमा कंपनीशी संबंधित व्यक्तीशी संपर्क करा. तुमच्याकडे विमा क्रमांक इत्यादी काही माहिती असल्यास कंपनीकडे सादर करा. जेणेकरुन कंपनी तुम्हाला नवीन कागदपत्र ईमेलद्वारे पाठवू शकते.
परदेशात असताना कोणत्याही संकटात असताना काय कराल?
तुम्ही परदेशात असाल आणि एखाद्या संकटात सापडलात, तर सर्वात आधी तेथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून माहिती द्या. त्यानंतर भारतीय दूतावास तुम्हाला सर्व सुविधा आणि मदत उपलब्ध करुन देईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
भारत
निवडणूक
Advertisement