Crude Oil Price : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सरकारच्या चिंतेत वाढ, वाढत्या दराबाबत अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबरोबरच इंधनाच्या वाढत्या किमतीला पर्याय म्हणून केंद्र सरकार पर्यायी स्त्रोत वापरण्याचा विचार करत असल्याचे संकेत सीतारमण यांनी दिले आहेत.
Crude Oil Price : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 12 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमधील युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या वाढत्या किंमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबरोबरच इंधनाच्या वाढत्या किंमतीला पर्याय म्हणून केंद्र सरकार पर्यायी स्त्रोत वापरण्याचा विचार करत असल्याचे संकेत निर्मला सीतारमण यांनी दिले आहेत.
कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संवादात्मक सत्रात निर्मला सीतारमण यांना कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि युक्रेन-रशिया संघर्षाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना "इंधनाच्या वाढत्या किंमतीला पर्याय म्हणून केंद्र सरकार पर्यायी स्त्रोत वापरण्याचा विचार करत आहे, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.
"रशिया आणि युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. भारत 85 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. त्यामुळे तेलाच्या किमती वाढणे ही चिंतेची बाब असते. तेलाच्या किमती अजून किती वाढतील हे पाहावे लागेल, असे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.
"तेल विपणन कंपन्या 15 दिवसांच्या सरासरीच्या आधारावर किरकोळ किंमती निश्चित करतात, परंतु, आम्ही आता जे आकडे बोलत आहोत ते सरासरीच्या पलीकडे आहेत. वाढत्या तेलाच्या किमतीला आम्ही पर्यायी स्त्रोत शोधत आहोत." अशी माहिती निर्मिला सीतारमण यांनी दिली आहे.
अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, भारतीय अर्थव्यवस्थेवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम होईल. तेलाच्या वाढत्या किमतींसाठी अर्थसंकल्पात काही तरतुदी करण्यात आल्या आहेत, परंतु, या तरतुदी फक्त सामान्य चढ-उतारांवर आधारित आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती सामान्य नाही. त्यामुळे या परिस्थितून बाहेर पडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."
महत्वाच्या बातम्या