एक्स्प्लोर

Nagpur CNG Price : ना पेट्रोल, ना डिझेल सीएनजीनं कापला खिसा, देशात सर्वाधिक दर नागपुरात

Nagpur CNG Price : देशात सर्वात महाग सीएनजी नागपुरात! प्रतिकिलो दर 120 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळं नागरपुरात सीएनजीनं पेट्रोल, डिझेलाही मागे टाकलं आहे.

Nagpur CNG Price : नागपुरात (Nagpur) सीएनजी (CNG) म्हणजेच, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या दरांनी विक्रमी उंच्चांक गाठला आहे. आज नागपुरात सीएनजी 120 रुपये प्रति किलो या दरानं उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, परवापर्यंत नागपुरात सीएनजी शंभर रुपये प्रति किलो या दरानं उपलब्ध होता. त्यामुळे एकाच दिवसात 20 टक्‍क्‍यांची दरवाढ करण्यात आल्यानं सर्वसमान्यांना मोठा धक्का बसला आहे. 

शंभर रुपये प्रति किलोवरुन थेट 120 रुपये प्रतिकिलो दरावर सीएनजी पोहोचल्यामुळं सीएनजी आधारित वाहन चालवणाऱ्यांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे. कोरोना, लॉकडाऊन यांमुळे आधीपासूनच महागाईचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट यामुळं आणखी बिघडलं आहे.

नागपुरात सीएनजीचा पुरवठा करणारे तीनच पंप असून ते रॉमेट या कंपनीचे आहेत. तिनही ठिकाणी सीएनजीचे दर 120 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. रॉमेट कंपनीच्या अधिकार्‍यांशी एबीपी माझानं बातचित केली. त्यांचं म्हणणं आहे की, नागपुरात सीएनजी वाहण्यासाठीचा खर्च कमालीचा वाढला आहे. 

पाहा व्हिडीओ : Nagpur CNG Price : नागपुरात पेट्रोल, डिझेलपेक्षा सीएनजी महाग! सीएनजीचे दर प्रतिकिलो 120 रुपयांवर

गुजरातमधील दहेजमधून एलएनजी (LNG) आणून नागपुरात त्याचं सीएनजीमध्ये रूपांतरण केलं जातं. जागतिक पातळीवर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच एलएनजीचे दर गगनाला भिडले आहेत. शिवाय गुजरातमधून नागपूरपर्यंत एलएनजी आणण्याचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव नागपुरात सीएनजीचे दर शंभर रुपये प्रतिकिलो वरून 120 रुपये प्रतिकिलो करावे लागले आहेत. नागपूरपर्यंत गॅस वाहून आणणारी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर सीएनजीचे दर खाली येतील, असं रॉमेट कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, पाच राज्यातल्या निवडणुकांचा रणसंग्राम संपला आहे. साऱ्यांचं लक्ष आता निवडणुकांच्या निकालाकडे आहे. मात्र निवडणुका संपल्यानंतर नागरिकांनाही धडकी भरली. कोणत्याही क्षणी इंधन दरवाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरवाढीच्या भीतीनं मुंबईत पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. निवडणुकांचा निकाल जाहीर होताच, केंद्र सरकार ही दरवाढी जाहीर करणार असल्याची चर्चा आहेत. त्यामुळे काल रात्री पेट्रोल पंपांवर नागरिकांची रांग पाहायला मिळाली. रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळं कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या दरांनी रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 139 डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचली आहे. त्यामुळे आता पेट्रोल कंपन्यांची भूमिका आणि केंद्र सरकारच्या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ? किंमतीत 10 ते 12 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता, आजचे दर काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Rajan Vichare Lok Sabha Elections : शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारेंनी फोडला प्रचाराचा नारळRahul Shewale on Lok Sabha Election : ठाकरेंच्या अनिल देसाईंविरोधात शिवसेनेकडून राहुल शेवाळे मैदानातMVA Meeting for Seating Sharing : मविआच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? जागावाटपाचा तिढा सुटला?Prakash Ambedkar Special Report : प्रकाश आंबेडकरांचा ट्विटर बाॅम्ब; संजय राऊतांना करडे सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Embed widget