एक्स्प्लोर
Advertisement
बिन्नी बन्सल यांचा फ्लिपकार्टच्या सीईओ पदाचा राजीनामा
बिन्नी यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप झाला होता. या प्रकरणात त्यांची वॉलमार्ट आणि कंपनीकडून स्वतंत्र चौकशीही सुरू होती. या सर्व प्रकरणामुळेच बिन्नी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
नवी दिल्ली : फ्लिपकार्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याचे वॉलमार्टकडून सांगण्यात आले आहे. कल्याण कृष्णमूर्ति आता फ्लिपकार्टचे सीईओ म्हणून कार्यभार सांभाळतील.
बिन्नी यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप झाला होता. या प्रकरणात त्यांची वॉलमार्ट आणि कंपनीकडून स्वतंत्र चौकशीही सुरू होती. या सर्व प्रकरणामुळेच बिन्नी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
बिन्नी बन्सल यांनी सचिन बन्सल यांच्यासोबत फ्लिपकार्टची स्थापना केली होती. सचिन यांनी फ्लिपकार्टच्या विक्रीवेळीच राजीनामा दिला होता. त्यानंतर सहा महिन्यांनीच बिन्नी यांनी राजीनामा दिला आहे. बिन्नी बन्सल यांच्यावर वैयक्तिक गैरवर्तनाचा आरोप असून या प्रकरणी त्यांची चौकशी सुरु होती. त्यांच्यावर अशाप्रकारचे आरोप का करण्यात आले होते, याची नेमकी माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही. परंतु, फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडून त्यांच्यावरील या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी सुरु असल्याचे वॉलमार्टने सांगितले.
गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडून झालेल्या स्वतंत्र चौकशीनंतर बिन्नी यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बिन्नी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
माहितीनुसार, चौकशीदरम्यान बिन्नी बन्सल यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र, त्यांनी काही निर्णय घेताना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. बिन्नी यांनी पुरेशी पारदर्शकता न ठेवता काही निर्णय घेतले. त्यामुळे आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे वॉलमार्टने सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement