एक्स्प्लोर

लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या मिळवा 'या' पाच सेवा

लॉकडाऊनच्या काळात देखील आपलं सगळ सुरळीत सुरू आहे. हे सगळ घरबसल्या आपल्याला शक्य आहे ते इंटरनेटमुळे. लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या खालील पाच सेवा आपल्याला इंटरनेटमुळे सहज मिळवता येणार आहे.

इंटरनेट नावाच्या अदृश्य शक्तीनं ज्ञानाचं एक नवं जग खुलं केलं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडलेले राहिल्यामुळे नवनवीन माहिती मिळविण्याबरोबरच इतर अनेक आर्थिक संधीही खुल्या होत आहेत. घरात बसून दुसरे काही करण्यासारखे नसेल तर प्रत्येकाच्या हाती मोबाइल आहे. कोणी कामासाठी तर कोणी गेम, कोणी सोशल मीडिया तर कोणी व्हिडिओ कॉलिंगसाठी नेट वापरत आहेत. समजा जर या लॉकडाऊनमध्ये आपल्याकडे मोबाईल नसता तर आपण काय केले असते हा विचार देखील मनात आला तर टेन्शन येतं. लॉकडाऊनच्या काळात देखील आपलं सगळ सुरळीत सुरू आहे. हे सगळ घरबसल्या आपल्याला शक्य आहे ते इंटरनेटमुळे. लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या खालील पाच सेवा आपल्याला इंटरनेटमुळे सहज मिळवता येणार आहे.

घरगुती साहित्य

कोरोना रोखण्यासाठी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांनी किराणा वस्तूंची घरपोच सेवा सुरु केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन ई-कॉमर्स कंपन्यांची यंत्रणा कार्यरत झाली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे घरबसल्या एक क्लिकवर हवी ती वस्तू तुम्हाला मागवता येते. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, बिगबास्केट, ग्रोफर्स, झोमॅटो, स्विगी या कंपन्या या सेवा देतात. अत्यावश्यक सेवा म्हणजे भाज्या, कडधान्य, मांस, फळं, तेल यासांरखे पदार्थ मागवता येणार आहे. याची सर्व माहिती त्यांच्या वेबसाइटवर आहे.

लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या  मिळवा 'या' पाच सेवा

ऑनलाईन रिचार्ज

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्यामुळे आपण इटंरनेटवर विरंगुळा शोधण्यास सुरूवात केला आहे. दिवसभर मोकळा वेळ हाती असल्यानेअनेक चित्रपटे डाऊनलोड करणे, गाणी डाऊनलोड करणे, विविध ऑनलाइन गेम्स खेळणे तसेच प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नसल्याने नातेवाईकांसोबत व्हिडिओ कॉलने संपर्क साधला जात आहे. त्याशिवाय वर्क फ्रॉम होम चा पर्याय मिळालेल्या नोकरदारांना आपापले कार्यालयीन काम ऑनलाइन माध्यमातून करावे लागत आहे. ही सर्व कामे आपण विनाअडथळा करता यावी यासाठी एअरटेलने थँक्स अॅप आणले आहे. अॅपच्या माध्यमातून कोणतही मोबाईल रिचार्ज, डी.टी एच रिचार्ज घरबसल्या काही क्षणात करता येणार आहे. घरबसल्या रिचार्ज करणं एअरटेलमुळे सहज शक्य झालं आहे. आपले अनेक असे नातेवाईक, मित्र आहेत की, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही किंवा ते तेवढे टेक्नो फ्रेंडली नाही. अशा वेळी तुम्ही मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करून त्यांची छोटी मदत नक्कीच या अॅपच्या माध्यमातून करू शकता.

ऑनलाइन फार्मसी

कोरोनामुळे लोक आरोग्याच्या बाबतीत अधिक सजग झाले आहेत. थंडी-ताप, सर्दी यांसारखे आजार होत असतील तर दवाखान्याकडे धाव घेत आहेत. मात्र काही ठिकाणी दवाखाने बंद आहेत. अशा वेळी डॉक्टरांशी फोनवरून संपर्क साधला जात आहे. लक्षणे समजून घेऊन डॉक्टर व्हाट्सअ‍ॅपद्वारे औषध लिहून देत आहेत. हे औषध रुग्ण केमिस्टकडे पाठवत आहेत. केमिस्ट घरपोच औषध पोहोचवत आहेत. यालाचा ऑनलाइन फार्मसी किंवा इंटरनेट फार्मसी म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष दुकानात न जाता वेब पोर्टलवरून किंवा अ‍ॅपवरून औषधांची खरेदी करणे.

ई- लर्निंग

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना सरकारने देशभरातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे विविध अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने महाविद्यालयातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिकवणीसाठी ऑनलाईन अध्यापन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयानंतर BYJU ने ही आपले अॅप विद्यार्थ्यांसाठी फ्री ठेवले आहे. जेणेकरुन मुले घरी बसून त्यांचा अभ्यास करू शकतील. इंटरनेटचा वापर करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यापासून ते त्यांच्या असाइनमेंट्स सोडवून घेण्यापर्यंत विविध कामांना ऑनलाइन स्वरूप देण्यात आले आहे. UnfoldU, myCBSEguide – CBSE Papers & NCERT Solutions या अॅपची विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते. फक्त अॅपच नाही तर माहिती देणाऱ्या अनेक वेबसाईट देखील सध्या आहे. फक्त अॅपच नाही तर Upgrad and unacademy या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या प्रमाणित अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.

आरोग्य

घरी जेव्हा आपण काम करतो, तेव्हा अनेकदा आपण आपल्या सोयीनुसार कसंही बसून काम करतो, शिवाय अशा अनेक चुका करतो ज्यामुळे शारीरिक वेदना उद्बवतात. विशेषत: पाठदुखी आणि कंबरदुखी. ऑफिसमध्ये असताना आपण छोट्या छोट्या कामांसाठी, जेवणाठी, चहा पिण्यासाठी एका जागेवरून उठतो, हालचाल करतो. मात्र घरी शरीराची अशी हालचाल होत नाही. घरात असताना आपली शारीरिक हालचाल होत नाही. त्यामुळे किमान 30 मिनिटं तरी व्यायाम करायला हवा. सध्या जिम बंद असल्याने बाहेर पडता येत नाही. परंतु घरबसल्या Cult.Fit app च्या माध्यमातून आपण काळजी घेऊ शकतो.

करोनाशी लढताना डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस, खाद्यपदार्थ घरापर्यंत पोहचवणारे तसेच अत्यावश्यक सेवेत कार्यरत प्रत्येकाचे आपण आभार मानले पाहिजे. त्यांना घरात बसून आपण सहकार्य करू कारण घराबाहेरची लढाई ते लढतं आहे. आपण फक्त घरात राहून त्यांना साथ देऊ. घरी राहा, सुरक्षित राहा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Ajit Pawar : मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
Arvind Kejriwal : दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Parbhani : शरद पवारांनी घेतली Somnath Suryawanshi यांच्या कुटुंबीयांची भेट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 December 2024Bajrang Sonwane Beed:सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवार घेणार - सोनावणेNilesh lanke On Santosh Deshmukh : आम्ही सगळे देशमुख कुटुंबीयांच्यासोबत आहोत -लंके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Ajit Pawar : मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
Arvind Kejriwal : दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
Rajesh Kshirsagar : मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
Prakash Abitkar : मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; कोल्हापुरात जंगी स्वागत होताच मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
Rahul Gandhi : शरद पवारांनंतर राहुल गांधीही परभणीत येणार; सूर्यवंशी कुटुंबियांची घेणार भेट, दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर
शरद पवारांनंतर राहुल गांधीही परभणीत येणार; सूर्यवंशी कुटुंबियांची घेणार भेट, दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर
Embed widget