दिल्लीच्या सीमेवर 70 दिवसांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटना तीन नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करीत आहेत. याला वेग देण्यासाठी शनिवारी शेतकरी संघटनांनी देशव्यापी चक्का जाम जाहीर केला आहे. चक्का जाम दुपारी 12 ते 3 या वेळेत तीन तास असणार आहे.
2/6
राकेश टिकैत यांनी खिळे ठोकलेल्या जागेवर डंपरने माती टाकली आणि नंतर फावड्याने माती पसरवून तिथे वृक्षारोपण केलं.
3/6
राकेश टिकैत यांच्या म्हणण्यानुसार दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कोणत्याही प्रकारचा चक्काजाम होणार नाही.
4/6
26 जानेवारीला राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी गाझीपूरसह सर्व आंदोलनस्थळांवर तटबंदी उभारली आहे. गाझीपुरात आंदोलकांची आवक-जावक थांबवण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर खिळे ठोकले होते. दरम्यान, टीकेनंतर अनेक ठिकाणाहून खिळे हटविण्यात आले आहे.
5/6
आपल्या अश्रूंनी शेतकरी आंदोलनाला नवसंजीवनी देणारे भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांची शुक्रवारी गाझीपूर सीमेवर गांधीगिरी पाहायला मिळाली. प्रशासनाने खिळे लावलेल्या ठिकाणी टिकैत वृक्षारोपण करताना दिसले.
6/6
शनिवारी चक्का जामदरम्यान काही लोक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करतील याचा पुरावा असल्याचा दावा राकेश टिकैत यांनी केला आहे. तर जनहिताच्या दृष्टीने आम्ही उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशला चक्का जामपासून वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.