एक्स्प्लोर

Farmer Tractor rally violence: दिल्ली हिंसाचारानंतर ट्विटरने केली 550 हून अधिक अकाउंटवर कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका

दिल्ली येथे ट्रॅक्टर परेडच्या दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने हिंसाचाराला प्रवृत्त केल्याप्रकरणी 550 हून अधिक अकाउंट बंद केले आहेत. या संबंधीच्या प्रत्येक घडामोडीवर ट्विटरचे बारीक लक्ष असल्याचं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. (Twitter suspends over 550 accounts after violence during farmers' Republic Day tractor rally).

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची दखल आता ट्विटरनेही घेतली आहे. या प्रकरणी बुधवारी ट्विटरने जवळपास 550 हून जास्त अकाउंटवर बंदी आणली आहे. हे सर्व अकाउंट दिल्लीतील हिंसाचाराशी संबंधित असल्याचं ट्विटरने स्पष्ट केलंय.

ट्विटरच्या 'सिंथेटिक अॅन्ड मॅनिप्यूलेटेड मीडिया पॉलिसी' च्या नियमांचे उल्लंघन केल्याने या सर्व अकाउंटवर बंदी घातल्याचं स्पष्टीकरण ट्विटरकडून देण्यात आलंय. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला प्रवृत्त करणे आणि ट्विटरच्या नियमाचे पालन न करणे यामुळेच संबंधित अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तंत्रज्ञान आणि मानवी पुनरावलोकनाच्या पद्धतीचा वापर करुन ट्विटरने मोठ्या प्रमाणात काम केलं. त्यानंतर ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारी शेकडो खाती तसेच स्पॅम खाती अशा जवळपास 550 हून अधिक खात्यावर बंदी आणल्याची माहिती ट्विटरच्या प्रवक्त्याने दिली.

Farmer Tractor Rally Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी योगेंद्र यादव यांच्यासह 26 जणांवर गुन्हे दाखल

ट्विटरकडून परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत आहे आणि त्यासंबंधी अधिक जागरुकतेने काम करण्यात येत आहे, जर अशा पद्धतीने कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे ट्विटरच्या प्रवक्त्याने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले

दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या ट्रक्टर परेडला परवानगी देण्यात आली होती. पण नियोजित मार्गाचा वापर न करता काही आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडले आणि ते दिल्लीच्या इतर भागात घुसले. त्यानंतर दिल्लीमध्ये मोठा हिंसाचार उफाळला. काही आंदोलकांनी दिल्लीच्या लाल किल्यावर जाऊन शीख समाजाचा ध्वज फडकावला. या दरम्यान सार्वजनिक मालमत्तेच मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. तसेच 300 हून जास्त पोलीस यामध्ये जखमी झाले आहेत.

Delhi tractor rally violence: दिल्ली हिंसाचाराचा तपास क्राईम ब्रान्चचं विशेष पथक करणार, 22 गुन्हे दाखल

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकूण 22 गुन्हे दाखल केले असून या हिंसाचाराचा तपास आता दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ ​​लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

गेल्या 60 दिवसांपासून पंजाब-हरयाणाचे शेतकरी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या पार पडल्या असून त्यामधून कोणताही निष्कर्ष निघाला नाही.

Farmers Protest | पवारसाहेब देशाचे जवान- पोलिसांच्या बाजूनं तुम्ही का बोलला नाहीत, आशिष शेलारांचा सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget