एक्स्प्लोर
प्रसिद्ध साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांचे निधन, लेखणीसह राजकीय कारकीर्दही गाजवली
वाघ हे 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीत सांतआंद्रेमधून निवडून येऊन प्रथमच गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते. उपसभापतीपदी असताना वाघ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तेव्हापासून ते व्हिलचेअरला खिळून होते.
![प्रसिद्ध साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांचे निधन, लेखणीसह राजकीय कारकीर्दही गाजवली Famous writer Vishnu Surya Wagh passed away प्रसिद्ध साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांचे निधन, लेखणीसह राजकीय कारकीर्दही गाजवली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/13231246/Vishnu-surya-vagh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पणजी : ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी उपसभापती विष्णू वाघ यांचे 8 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेत निधन झाले. वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी या संदर्भातील माहिती केपटाउन येथून दिली आहे. वाघ हे ऑगस्ट 2016 पासून ब्रेन स्ट्रोकमुळे आजारी होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी व कोकणी साहित्यिक विश्वाला व राजकीय क्षेत्रालाही धक्का बसला आहे. मृत्यूसमयी वाघ यांचे वय 53 वर्षे होते.
वाघ हे 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीत सांतआंद्रेमधून निवडून येऊन प्रथमच गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते. उपसभापतीपदी असताना वाघ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तेव्हापासून ते व्हिलचेअरला खिळून होते.
वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिने वाघ हे दोनापावल येथील मणिपाल इस्पितळात होते. ते वारंवार आजारी होऊ लागल्याने त्यांच्याच इच्छेनुसार केपटाऊन, जोहान्सबर्ग येथे त्यांना नेले होते. तिथे त्यांना आराम मिळाला होता, मात्र 8 रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. येत्या दोन दिवसांत त्यांचा मृतदेह गोव्यात आणून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
साहित्य क्षेत्रासह संगीत, नाट्य, चित्र, शिल्प आदी कलांमध्ये प्रभुत्व असणारे विष्णू वाघ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. मराठी राजभाषा व्हावी, यासाठी केलेल्या अनेक आंदोलनांत ते सतत अग्रभागी होते. त्यांचे अनेक कवितासंग्रह, नाटके, एकांकिका गोव्यासह देशभर गाजल्या.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ते एकेकाळी वादळी प्रचारक होते. काँग्रेसमध्येही ते रमले होते. शिवसेनेचे ते प्रवक्ते होते आणि भाजपच्या तिकिटावर ते आमदार बनले होते. पहिल्याच टर्ममध्ये ते गोवा विधानसभेचे उपाध्यक्षही बनले होते. कला अकादमीचे अध्यक्ष आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे अध्यक्ष म्हणूनही त्यांचं काम गाजलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नाशिक
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)