एक्स्प्लोर

Pan Aadhaar Linking Extension: मोठी घोषणा! पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदत वाढवली

पॅनकार्ड आणि आधार कार्ड संबंधित महत्त्वाची बातमी आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक आलं आहे. यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

मुंबई : पॅनकार्ड आणि आधार कार्ड (Pan Aadhaar Linking) संबंधित महत्त्वाची बातमी आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक आलं आहे. यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. जर पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. आयकर कायदा 1961 कलम 234H मुळे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. हे वित्त विधेयक सरकारने 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर केलेले मंजूर केले आहे.
  
जर आपण शासनाने दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण आपला आधार पॅनशी लिंक केले नाही तर यासाठी आपल्याला एक हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.  तसेच एखाद्या व्यक्तीने शेवटच्या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी जोडलं नाही तर त्यांचं पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच लिंक न केल्यास 30 सप्टेंबरनंतर ते पॅन कार्ड आर्थिक व्यवहारात वापरलं जाणार नाही. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करू शकणार नाही.

तुमच्या आधारकार्डवर कुणी सिमकार्ड घेतलंय का? असं चेक करा

आधार कार्ड पॅनशी लिंक आहे का कसं तपासणार?

सर्व प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in म्हणजेच आता नवीन वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जा. खाली दिलेल्या लिंक आधारच्या पर्यायावर क्लिक करा. आपलं स्टेटस पाहण्यासाठी Click here वर क्लिक करा. नवीन विंडोवर पॅन आणि आधार तपशील भरा. तिथे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही तपासा आणि नसेल तर लगेच लिंक करा. 

पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा?

  • तुम्हाला TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यात Services ऑप्शनमध्ये PAN सेक्शन उपलब्ध आहे. यावर क्लिक करा. 
  • तुम्ही थेट https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html लिंकवर जावू शकता.
  • येथे तुम्हाला अॅप्लिकेशन टाइपची डिटेल्स द्यावी लागेल. भारतीय नागरिकांसाठी Form 49A फॉर्म भरावा लागेल. पुन्हा कॅटेगरीत individual सिलेक्ट करावे लागेल.
  • यानंतर आपले नाव, जन्म तारीख, कॉन्टॅक्ट डिटेल्स आदी माहिती भरा.
  • यानंतर CAPTCHA कोड भरून Submit बटनावर क्लिक करा. या ठिकाणी तुमचा टोकन नंबर जनरेट होईल.
  • त्यानंतर तुम्हाला एका पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. ज्यात तीन पर्याय देण्यात येतील. यासाठी तुम्हाला पॅनकार्डसाठी सबमिट करावे लागेल.
    e-KYC आणि e-sign चा वापर करून डिजिटली डॉक्युमेंट्स सबमिट करू शकतात. किंवा तुम्ही फिजिकली सुद्धा डॉक्यूमेंट्स सबमिट करू शकता.
  • सर्व सूचना वाचून नेक्स्ट बटनावर क्लिक करा.
  • पुढे अॅड्रेस प्रूफ आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यावी लागेल.
  • त्यानंतर आपले असेसिंग ऑफिसर AO सेलेक्ट करावा लागणार आहे. या पेजवर तुम्हाला संबंधित माहिती मिळेल. सर्व डिटेल्स भरल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा.
  • ओळख पत्र, अॅड्रेस प्रूफ आणि जन्मतारीख. आता तुम्हाला फोटोग्राफ आणि साइन अप अपलोड करावे लागेल. पुन्हा सबमिट करावे लागेल.
  • अॅप्लिकेशन सबमिट केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला आधार लिंक फोनवर एक ओटीपी येईल. येथे एन्टर केल्यानंतर रिसिटला प्रिंट करून ठेवा. 
  • यामध्ये 15 अंकाचा एक्नॉलिजमेंट नंबर असणार आहे. या रिसिटला साइन करा. तसेच NSDL ऑफिस मध्ये किंवा पोस्ट कुरियद्वारे पाठवू शकता. अॅप्लिकेशन सबमिट केल्यानंतर 15 दिवसात तुम्हाल पॅन कार्ड मिळेल.
 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case: : निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Embed widget