Mask in Public Places : कोरोनाचा धोका कमी, देशातील 'या' राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती रद्द
देशात हळूहळू कोरोनाचा धोका कमी होत आहे. त्यामुळे देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये पूर्वीच्या तुलनेत नियमांध्ये शिथीलता आणली आहे.
![Mask in Public Places : कोरोनाचा धोका कमी, देशातील 'या' राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती रद्द Exemption from wearing masks in public places in chhattisgarh no fine will be imposed Mask in Public Places : कोरोनाचा धोका कमी, देशातील 'या' राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती रद्द](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/2a56ce3be5e378c4150e42d4c802a6e9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mask in Public Places : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे नियमांमध्ये देखील शिथीलता आणली आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये पूर्वीच्या तुलनेत नियमांध्ये शिथीलता आणली आहे. दरम्यान, छत्तीसगडमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची आवश्यक आता असणार नाही.
छत्तीसगडमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्यांना दंड भरावा लागणार नाही. राज्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या घटत्या रुग्ण संख्येनंतर छत्तीसगड राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 500 रुपयांच्या दंड आकारण्यात येत होता. मात्र, आता तो नियम स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आता मास्क घालण्याची आवश्यकता आता असणार नाही. यासंदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने मास्क न घातल्याबद्दल दंड तत्काळ स्थगित करण्याचा आदेश जारी केला आहे.
मागील वर्षी 25 मार्चला छत्तीसगड राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश जारी केले होते. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र, आता छत्तीसगडमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे. मंगळवारी राज्यात फक्त कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे नियम शिथील करण्यात आले आहेत.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, अद्याप कोरोनाचा धोका कमी झाला नाही. कोरोनाची रुग्णसंख्या सध्या नियंत्रणात आहे. मात्र सरकार सातत्याने यावर लक्ष ठेवून असल्याचे मांडविया यांनी सांगितले. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी, अद्याप धोका कमी झाला नसल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन मनसुख मांडविया यांनी केले आहे.
महत्त्वाची बातमी:
- Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाचा संसर्ग घटला, गेल्या 24 तासांत नवीन 796 कोरोना रुग्णांची नोंद, 19 जणांचा मृत्यू
- Sri Lanka Crisis : श्रीलंकन सरकार हतबल; फक्त खाद्यपदार्थ आणि इंधन खरेदी इतकेच डॉलर्स शिल्लक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)