एक्स्प्लोर
जेलमध्येच छोटा राजनला संपवण्याचा दाऊदचा प्लान, पण...
नवी दिल्ली: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियातील बाली एअरपोर्टवर अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात आलं. राजन स्वत:हून अटक झाला की, त्याला अटक करण्यात आली याबाबत बरीच चर्चाही तेव्हा रंगली होती.
दाऊदच्या डी कंपनीच्या भीतीमुळं छोटा राजननं स्वत:ला अटक करुन घेतल्याची चर्चा आहे.
पण ही कहाणी इथंच संपत नाही. अटक केल्यानंतर छोटा राजनला भारतात आणण्यात आलं. पण त्याला मुंबईला न ठेवता त्याची रवानगी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये करण्यात आली. पण ज्याप्रमाणे गुप्तचर यंत्रणा राजनबाबत सतर्क होती त्याचप्रमाणे डी कंपनीनंही छोटा राजनला संपवण्यासाठी बरीच तयारी केली होती.
याचदरम्यान, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिहार जेलमधील अधिकारी सुनील गुप्ता यांना एका मोबाइल क्रमांकावरुन मेसेज आला. ज्यामध्ये त्यांना शिविगाळ करण्यात आली होती. त्यात असंही म्हटलं होतं की, सुरक्षा यंत्रणांनी कितीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही ठार मारु. या मेसेजमध्ये छोटा राजनचं नाव लिहलं नव्हतं. पण ज्या क्रमांकावरुन हा फोन आला होता तो फारच महत्वाचा होता.
तिहार जेलच्या सुत्रांनुसार, हे सगळे मेसेज राजनसंबंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जेल प्रशासनाचे धाबे दणाणले आणि त्यांनी याची माहिती सरकारला दिली.
तसंच राजनला सुरक्षित सेलमध्ये हलविण्यात आलं. एकीकडे दाऊदचा उजवा हात समजला जाणारा छोटा शकील राजनला ठार मारण्याची धमकी देत असताना दुसरीकडे त्यानं तशी तयारीही केली होती.
या कामासाठी त्याला एका मोहऱ्याची गरज होती आणि तसा मोहरा त्याला सापडलाही. छोटा शकीलनं आपला डावही खेळला. पण भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याचा हा डाव उधळून लावला.
दिल्लीमधील शूटरकडून राजनचा काढायचा होता काटा
छोटा राजनला मारण्यासाठी डी कंपनीने दिल्लीत राहणाऱ्या जुनैदला तयार केलं. यासाठी त्याला एक लाखही देण्यात आले. एवढ्या कमी पैशात तो देखील तयार झाला कारण, की यामुळे तो थेट डी कंपनीशी जोडला जाणार होता.
चौकशीदरम्यान, दिल्ली पोलिसांना असं समजलं की, दाऊद कंपनीमध्ये सहभागी होण्याच्या आशेनं या दोन्ही शूटर्सनं सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे बराच सावधपणा बाळगला होता. त्यामुळे ही लोक कोडवर्डमध्ये बोलायचे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर कोणालाही संशय यायचा नाही.
राजनला मारण्यासाठी काय होते कोडवर्ड:
- हत्याराला फाइल म्हटलं जायचं.
- छोटा राजनला पेशंट म्हणून संबोधलं जायचं.
- खबऱ्याला डॉक्टर असा कोडवर्ड होता.
- तिहार जेलला एम्स हॉस्पिटल म्हटलं जायचं.
जरीही शूटर कोडवर्डमध्ये बोलत असले तरीही छोटा शकील ज्या नंबरवर बोलत होते. तो नंबर पहिल्यापासूनच सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता.
फोनवरील संभाषणात ज्या कोडवर्डचा वापर होत होता. त्यावरुन स्पष्ट होतं की, रोजर आणि जुनैद हे छोटा राजनविषयीच बोलत होते. ते राजनच्या जेलमधील माहिती काढण्याचा प्रयत्न करीत होते. पण अखेर रोजर आणि जुनैद यांनाच आता तिहार जेलमध्ये जावं लागलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement