एक्स्प्लोर

Ews Reservation : ईडब्ल्यूएस आरक्षण उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपये कायम, केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी (Ews Reservation) आर्थिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपयेच राहणार आहे. केंद्र सरकारने त्याबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme court) प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

नवी दिल्ली : ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी (Ews Reservation) आर्थिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपयेच राहणार आहे. केंद्र सरकारने त्याबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme court) प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

ईडब्ल्यूएस आरक्षणासाठीच्या आर्थिक  उत्पन्न मर्यादेवर फेर विचार करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने सुचवले होते. कोर्टाच्या या आदेशानंतर सरकारकडून समिती नेमण्यात आली होती. यावर ईडब्ल्यूएससाठी वरकरणी आठ लाख रुपये ही अट सारखी वाटत असली तरी त्यांच्यासाठीच्या अटी ओबीसी पेक्षा वेगळ्या आहेत असा दावा समितीने केला. 

नीट आणि पीजी प्रवेशासंदर्भात कोर्टात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की, ज्यांचे उत्पन्न वर्षाला आठ लाख रूपये आहे. अशाच कुटुंबांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.  

केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे सचिव आर. सुब्रमण्यम यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी आदपूर्वक सांगू इच्छितो की, केंद्र सरकारने समितीच्या शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये निकष लागू करण्याच्या शिफारशींचाही समावेश आहे."

ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या दोन्ही गटांसाठी सामाजिक पार्श्वभूमी वेगळी असताना उत्पन्न मर्यादा मात्र एकच का? असा प्रश्न कोर्टाने विचारला होता. त्यावर सरकारकडून तीन सदस्यांची समीती स्थापन केली होती. अभ्यासाअंती या समितीने, ईडब्ल्यूएससाठी वरकरणी आठ लाख रुपये ही अट सारखी वाटत असली तरी त्यांच्यासाठीच्या अटी ओबीसी पेक्षा वेगळ्या आहेत असा दावा समितीने केला आहे. शिवाय ईडब्ल्यूएस नॉन क्रिमीलेअर ठरविण्यासाठी काही बदलही समितीने सुचवले आहेत. पण हे बदल पुढच्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या वर्षीचे प्रवेश सध्याच्या निकषानुसार करण्याचेही निर्देश दिले आहेत. यासंदर्भात पुढील सुनावणी आता 6 जानेवारी रोजी होणार आहे. 

दरम्यान, मेडिकल, पीजी, नीट कौन्सिलिंगच्या प्रवेश प्रक्रीयेमध्ये या मुद्द्यांमुळेच गोंधळ निर्माण झाला आहे. डॉक्टरांचे आंदोलनही यामुळेच सुरू आहे. त्यामुळे आता केंद्राच्या प्रतिज्ञापत्रानंतर हा सगळा मुद्दा सुरळीत होऊन प्रवेश प्रक्रिया मार्गी लागते का पहावे लागणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushama Andhare PC | जय श्रीरामच्या घोषणा, सुषमा अंधारेंना नागपूर विमानतळावर जिवे मारण्याची धमकीMumbai Andheri Accident : रस्ता ओलांडताना बाईकने उडवलं, तरुण डिव्हायडरवर पडला|CCTVNarhari Zirwal on Chhagan Bhujbal : भुजबळांचा पुढे मोठा विचार होणार, नरहरी झिरवळांचं सूचक वक्तव्यTop 100 : 100 headlines 17 December 2024 एबीपी माझा लाईव्ह ABP LIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Video: विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
Wisconsin School Shooting : अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं?
उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं
Embed widget