एक्स्प्लोर
Advertisement
अमिताव घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार
इंग्रजीमधले प्रख्यात लेखक अमिताव घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला आहे.
नवी दिल्ली : इंग्रजीमधले प्रख्यात लेखक अमिताव घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला आहे. देशातील सर्वोच्च साहित्य सन्मान असलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये अमिताव घोष यांना 11 लाख रुपये, वाग्देवीची प्रतिमा आणि प्रशस्ती पत्र दिले जाणार आहे. ज्ञानपीठ समितीच्या आज झालेल्या बैठकीत 54 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताव घोष यांचे नाव निश्चित करण्यात आले.
ज्ञानपीठ पुरस्कार दिल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तीन वर्षांपूर्वी इंग्रजी भाषेचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर इंग्रजी साहित्यातील योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे अमिताव घोष हे पहिले इंग्रजी साहित्यिक ठरले आहेत.
अमिताव घोष यांचा अल्प परिचय
अमिताव घोष यांचा जन्म 1956 साली पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे झाला. घोष यांना यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दी सर्कल ऑफ रिजन, दी शॅडो लाइन, दी कलकत्ता क्रोमोसोम, दी ग्लास पॅलेस, दी हंगरी टाइड, रिव्हर ऑफ स्मोक, फ्लड ऑफ फायर या घोष यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement