एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशातला प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीत विजयासाठी हापापलेला : निवडणूक आयुक्त
देशातला प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीत विजयासाठी हापापलेला झाला असून, सध्याच्या राजकारणात निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधींना विकत घेणं उत्तम राजकीय व्यवस्थापन मानलं जात असल्याचं मत निवडणूक आयुक्त ओ.पी.नायर यांनी नोंदवलं.
नवी दिल्ली : नुकत्याच गुजरामधील राज्यसभा निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर जवळपास 10 दिवसांनी निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी मौन सोडलं आहे. देशातला प्रत्येक पक्ष आज निवडणूक जिंकण्यासाठी हापापलेला असल्याचं मत त्यांनी यावेळी नोंदवलं. गुरुवारी एडीआरच्या एका कार्यक्रमात निवडणुक आयुक्तांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
ते म्हणाले की, ''जेव्हा निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि शांततेत होत असतात, तेव्हा लोकशाही अधिक बळकट होत असते. पण सध्या निवडणुकांची स्क्रिप्ट पहिल्यापासूनच तयार असल्याची शंका सर्वसामान्य व्यक्तीला येत आहे. कारण, प्रत्येक राजकीय पक्षाला कोणत्याही किमतीत निवडणुकीत विजय हावा असतो. जिथे नैतिकतेला कोणताही थारा नसतो.''
ओ.पी.रावत पुढे म्हणाले की, ''या काळात लोकप्रतिनिधींना सरसळसरळ विकत घेणे म्हणजे, उत्तम राजकीय व्यवस्थापन मानलं जातं. या कामात राज्यातली सर्व यंत्रणाही वापरली जाते.'' त्यामुळे यातून निवडणूक प्रक्रिया मुक्त झाली पाहिजे, अशीही अपेक्षा रावत यांनी यावेळी व्यक्त केली.
नुकत्याच संपन्न झालेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसनं आपली सर्व ताकद पणाला लावली होती. विशेष म्हणजे, आपले आमदार फुटू नयेत, यासाठी काँग्रेसला आपल्या आमदारांना बंगळुरुच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवावं लागलं होतं.
दुसरीकडे आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचं खच्चिकरण करण्यासाठी राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी विशेष रणनिती तयार केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण तरीही राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अहमद पटेल यांचा विजय झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement