Rahul Gandhi : 'मत चोरी'च्या आरोपांवर निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस, शकुन राणीच्या दुहेरी मतदानाचे पुरावे सादर करण्याचे निर्देश
Rahul Gandhi Vote Theft Allegation : लोकसभा निवडणुकीत मतचोरीचा आरोप केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कर्नाटक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांनी नोटीस बजावली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मत चोरी केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्यासंबंधी पुरावे देताना राहुल गांधींनी शकुन राणी या महिलेचा संदर्भ दिला होता. त्या शकुन राणीने दोन वेळा मतदान केल्याचा दावा राहुल गांधींनी केला. त्यावर आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. या संबंधी सर्व पुरावे सादर करा असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
राहुल गांधी यांनी नुकत्याच दिल्लीतील एका परिषदेत असा दावा केला होता की शकुन राणी नावाच्या महिला मतदाराने दोन वेळा मतदान केले. त्यांनी या संदर्भात काही दस्तऐवज दाखवले होते. मात्र, चौकशीत शकुन राणी यांनी हा आरोप फेटाळून लावत 'मी केवळ एकदाच मतदान केले' असे स्पष्ट केले. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.
निवडणूक आयोगाच्या नोटीसमध्ये नेमकं काय?
- प्राथमिक चौकशीत राहुल गांधींनी दाखवलेला टिक-मार्क असलेला दस्तऐवज अधिकृत मतदान अधिकाऱ्यांनी दिलेला नाही असे आढळले.
- राहुल गांधींना संबंधित सर्व मूळ कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- या पुराव्यांच्या आधारे आयोग प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.
भारतीय निवडणूक प्रक्रियेत दुहेरी मतदान हा गंभीर गुन्हा मानला जातो. अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास IPC अंतर्गत कारवाई आणि मतदार यादीतून नाव वगळणे अशी कारवाई केली जाते
Bihar Election SIR : बिहार निवडणुकीवर काय म्हणाला आयोग?
बिहारमधील मतदार याद्यांच्या संबंधी पुनर्निरीक्षणावर निवडणूक आयोगाने माहिती दिली. 1 ऑगस्ट 2025 रोजी ड्राफ्ट मतदार यादी प्रकाशित झाली. 1 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा अयोग्य नाव वगळण्यासाठी दावे-आक्षेप दाखल करता येतील. आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने यात बदलासाठी आयोगाशी संपर्क साधलेला नाही असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
या प्रकरणावर आता सर्वांचे लक्ष आयोगाच्या चौकशीच्या निष्कर्षाकडे लागले आहे, कारण यातून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत महत्त्वाचे संकेत मिळू शकतात.
Notice to Shri Rahul Gandhi, Hon’ble Member of Parliament and LoP, Lok Sabha.@ECISVEEP pic.twitter.com/plSfgoeytZ
— Chief Electoral Officer, Karnataka (@ceo_karnataka) August 10, 2025
Rahul Gandhi Vote Theft Allegation : राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर आरोप काय?
राहुल गांधींनी केलेल्या व्होट चोरी (Vote Theft) आरोपांनुसार, कर्नाटकातील बंगळुरूमधील महादेवपूर विधानसभा मतदार विभागात 1,00,250 पेक्षा अधिक मत चोरी झाल्याचा दावा केला. या आरोपांचा आधार ठेवण्यासाठी त्यांनी सहा प्रमुख मुद्द्यांची मांडणी केली.
ड्युप्लिकेट मतदार (Duplicate Voters)
– 11,965 लोक एकाच नावे दोनदा मतदान यादीत नोंदले गेले.
फेक किंवा अवैध पत्ते (Fake Invalid Addresses)
– 40,009 मतदारांकडे वास्तविक नसलेले किंवा अचूक नसलेले पत्ते दाखल केले गेले.
एकाच पत्त्यावर एकदम मोठा संख्या (Bulk Registrations at Single Address)
– 10,452 मतदार एका पत्त्यावर एकत्र नोंदले गेले; उदाहरणार्थ एक लहान खोलीत 80 लोकांची नावे.
अवैध फोटो (Invalid Photos)
– 4,132 मतदारांच्या यादीत फोटो चुकीचे आकाराचे होते किंवा नसताच होते.
फॉर्म 6 चा गैरवापर (Misuse of Form 6)
– 3,369 मतदारांनी Form-6 (नवीन मतदार म्हणून नोंदणीसाठी वापरलेला फॉर्म) अनेकदा गैरकायद्याने वापरला.
शकुन राणी प्रकरण (Case of Shakun Rani / Double Voting Allegation)
– एक 70 वर्षांच्या महिला मतदार शकुन राणी केवळ एकदाच मतदान केलेली असली तरी, त्यांचे नाव दोनदा यादीत आले असल्याचा दावा. राहुल गांधी यांनी अशी उदाहरणे कोर्टात आणि कमिशनसमोर मांडली.
राहुल गांधी यांच्या मते, या सहा प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणावर मतांमध्ये गैरव्यवहार झाला असून हा 'एक व्यक्ती, एक व्होट' या लोकतांत्रिक तत्त्वावरचा थेट हल्ला आहे. त्यांनी यासाठी डिजिटल मतदार सूची सार्वजनिक करण्याची मागणी केली, ज्यामुळे लोक आणि पक्ष आपोआप तपास करू शकतील
ही बातमी वाचा :
























