एक्स्प्लोर

ईद मुबारक! देशभरात रमजान ईदचा उत्साह

आज देशभरात ईद-उल-फित्र (रमजान ईंद) साजरी केली जात आहे. जामा मशीदेचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मंगळवारी चंद्र दिसल्याचे जाहीर केले. त्यासोबतच देशभरात ईदची घोषणादेखील केली.

मुंबई : आज देशभरात ईद-उल-फित्र (रमजान ईंद) साजरी केली जात आहे. जामा मशीदेचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मंगळवारी चंद्र दिसल्याचे जाहीर केले. त्यासोबतच देशभरात ईदची घोषणा करण्यात आली. इस्लामी कॅलेंडरनुसार रमजानचा महिना संपल्यानंतर ईद साजरी केली जाते. सऊदी अरबमध्ये काल (मंगळवारी) ईद साजरी करण्यात आली. कोलकाता, वाराणसी आणि आसामसहीत देशभरातील अनेक ठिकाणी ईदचा चंद्र पाहिला गेला. त्यामुळे रमजानचा महिना संपला आहे. रमजान काळातील रोजे (उपवास) ठेवल्यानंतर हा सण साजरा केला जातो. यावर्षी रमजानचा महिना 7 मे रोजी सुरु झाला असून 4 जून रोजी संपला. यादरम्यान मुस्लीम बांधवांनी एकूण 29 रोजे ठेवले. रमजान हा इस्लामी कालगणनेनुसार 9 वा महिना आहे. चंद्र दर्शनानंतर दिवस व महिना बदलल्याने शव्वाल महिन्याच्या (10 व्या महिन्याच्या) पहिल्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. ईदगाहमध्ये तसेच मशीदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात येते. मुंबईत आझाद मैदानात ही नमाज अदा करण्यात येणार आहे. ईद-उल-फित्र हा मुस्लीम धर्मातील एक पवित्र सण आहे. जगभरात ईदचा चंद्र दिसल्यानंतर मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. या दिवशी मुस्लीम बांधव ईदगाहजवळ (कोणतीही स्वच्छ जागा) एकत्र जमून नमाज अदा करतात. नमाजनंतर सर्व बांधव एकमेकांना मिठी मारुन ईदच्या शुभेच्छा देतात. रमजानला बरकतचा महिना मानले जाते. इस्लाममध्ये हज, रोजा, नमाज, कलमा आणि जकात या सुन्नत (पवित्र) गोष्टी आहेत. त्यात या महिन्यात उपवासासोबत (रोजा) अल्लाहची आराधना केली जाते. कोणी 7 कोणी 10 तर कोणी महिनाभर एका खोलीतच बसून राहून अल्लाहची ईबादत करतात. म्हणून बरकतसहित हा महिना ईबादतचा मानला जातो. शिवाय या महिन्यामध्ये आपल्या वर्षभराच्या कमाईचा काही भाग गरिबांमध्ये दान (जकात)केला जातो. त्याचबरोबर आर्थिक दूर्बल असलेल्या लोकांना धान्य वाटप केले जाते, त्यास फित्रा असे म्हणतात. म्हणून या ईदला ईद-उल-फित्र असे म्हटले जाते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget