ED Action : चिनी कंपनी व्हिवो मोबाइल्सवर ईडीची मोठी कारवाई; बड्या अधिकाऱ्यासह चौघे अटकेत
ED arrests Vivo Mobiles Executives : ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणाती व्हिवो मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.
![ED Action : चिनी कंपनी व्हिवो मोबाइल्सवर ईडीची मोठी कारवाई; बड्या अधिकाऱ्यासह चौघे अटकेत ED arrests 3 Vivo Mobiles executives and Lava International MD in money laundering case ED Action : चिनी कंपनी व्हिवो मोबाइल्सवर ईडीची मोठी कारवाई; बड्या अधिकाऱ्यासह चौघे अटकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/fa46d99fedecfb0e16e741aff775ce1f1696939345492290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : मूळची चिनी कंपनी असलेल्या व्हिवो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर (Vivo Mobile) ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. बड्या अधिकाऱ्यांसह ईडीने चौघांना अटक केली आहे. यामध्ये लावा इंटरनॅशनल कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाचा समावेश आहे. लावा इंटरनॅशनल (Lava International) ही कंपनी भारतीय मोबाईल कंपनी आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी नागरीक अॅण्ड्र्यू कुआंग, लावा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय आणि राजन मलिक आणि नितीन गर्ग या चार्टर्ड अकाउंटट यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने जवळपास एक वर्षापूर्वी व्हिवो मोबाईल कंपनीवर छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर 3 फेब्रुवारी 2022 रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत ईडीची चौकशी सुरू करण्यात आली. GPICPL वर फसवणूक, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करत कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला.
ईडीने मागील वर्षी व्हिवो मोबाईलशी संबंधित 48 ठिकाणांवर छापेमारी केली होती. या दरम्यान, कंपनीशी संबंधित असलेल्या 23 कंपन्यांच्या व्यवहाराची चौकशी केली होती. ईडीनुसार, व्हिवो मोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 1 ऑगस्ट 2014 रोजी करण्यात आली होती. ग्रँड प्रॉस्पेक्ट इंटरनॅशनल कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी व्हिवोशी संबंधित आहे. ही कंपनी स्थापन करताना अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे मनी लाँड्रिंग प्रकरणी या कंपनीची चौकशी सुरू असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. ईडीने आरोप केला आहे की व्हिवो मोबाईल कंपनीने भारतात कर भरावा लागू नये यासाठी अवैध मार्गाने चीनला 62,476 कोटी रुपयांची मोठी रक्कम पाठवली आहे. ईडीने व्हिवो कंपनीशी संबंधित 23 कंपन्यांच्या 48 ठिकाणी छापे टाकून 119 बँक खात्यांमधून 465 कोटी रुपये जप्त केले होते. यामध्ये 73 लाख रुपये रोख आणि 2 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)