एक्स्प्लोर

मोदी सरकारच्या कार्यकाळात विकासदर एवढा घसरण्याची नेमकी कारणं

ऐन बजेटच्या तोंडावर मोदी सरकारच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. कारण की, चालू आर्थिक वर्षात (2017-18) विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : ऐन बजेटच्या तोंडावर मोदी सरकारच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. 31 मार्चला संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षात (2017-18) विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असं झाल्यास मागील चार वर्षामधील हा निचांकी विकासदर असेल. म्हणजेच मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा सर्वात कमी विकास दर असणार आहे. मागील आर्थिक वर्षात 2016-17 मध्ये विकास दर 7.1 एवढा होता. त्यामुळे यंदा  विकासदरात घट झाल्यास त्याची दोन प्रमुख कारणं असणार आहेत. एक शेती आणि दुसरं उत्पादन. दोन्हीचा विकासदर मागील वर्षापेक्षा कमी असल्याचा हा परिणाम आहे. दरम्यान, सांख्यिकी सचिव टी सी ए अनंत यांच्या मते, ‘विकासातील वाईट काळ आता संपत आला आहे. पहिल्या त्रैमासिकात (एप्रिल-जून) दरम्यान रेकॉर्डब्रेक घसरण विकासदरात पाहायला मिळाली होती. पण दुसऱ्या त्रैमासिकात (जुलै-सप्टेंबर) परिस्थिती जरा सुधारली. तर आता चालू वर्षाच्या उर्वरित दोन त्रैमासिकात (ऑक्टोबर-डिसेंबर आणि जानेवारी-मार्च) आर्थिक विकास दर सात टक्के राहण्याचा अंदाज आहे.’ शेती व्यवसाय टीसीए अनंत यांच्या मते, शेती व्यवसायाचा विकासदर भलेही कमी झाला असेल, पण उत्पन्नात बरीच सुधारणा झाली आहे. सरकारी आकड्यांनुसार 2014-15 मध्ये 252.02 दशलक्ष टन खाद्यान्नाचं उत्पादन झालं होतं. 2016-17 मध्ये यात वाढ होऊन ते 275.68 दशलक्ष टन एवढ्यावर पोहचलं. 2017-18 मध्ये खाद्यान्नाचं उत्पादन 280 दशलक्ष टनाच्याही पुढे जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण दुसरीकडे जाणकारांचं मत काही वेगळंच आहे. जाणकारांच्या मते, खरीप आणि रब्बी पिकांचं उत्पादन यंदा कमी झालं. मान्सूनच्या नंतर जलाशयातील पाण्याची पातळी घटली. त्यामुळे पिकांवर परिणाम झाला. त्यामुळे संपूर्ण वर्षात उत्पादनाच्या आकड्यात फार काही वाढ होईल असं वाटत नाही. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात (2017-18 ) मध्ये शेती व्यवसायाचा विकास दर 2.1 टक्के राहण्याची शक्यता आहे. 2016-17 मध्ये हा दर 4.9 टक्के एवढा होता. उत्पादन क्षेत्र दुसरीकडे उत्पादन क्षेत्राचा विचार केल्यास तिथेली विकासदरात जास्त घसरण दिसून येते. 2016-17च्या 7.9 टक्केच्या तुलनेत यंदा उत्पादनाचा विकासदर 4.6 टक्के असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण यातील एक महत्त्वाची गोष्ट अशी की, या आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यात (एप्रिल-सप्टेंबर) उत्पादनात मोठी घसरण झाली. पण दुसऱ्या सहा महिन्यात (ऑक्टोबर-मार्च) स्थिती चांगली होत असल्याचं दिसून येत आहे. पहिल्या सहामाहीत जीएसटीचा परिणाम दिसून आला होता. पण जसजशी कर-व्यवस्था स्थिर झाली त्याचा परिणाम आता पाहायला मिळत आहे. याचमुळे डिसेंबर महिन्यात पीएमआय (परचेजिंग मॅनेजर इंडेक्स)मध्ये तेजी पाहायला मिळत आहे. उत्पादन क्षमता घटल्यानं रोजगाराच्या संधीही कमी होत असल्याचं सुरुवातीला दिसून आलं. उत्पादन क्षेत्रात जर एका व्यक्तीललला थेट रोजगार मिळाला तर कमीत कमी चार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. पहिल्या सह महिन्यात औद्योगिक उत्पादनात घट झाली होती त्यामुळे रोजगाराच्या फार नव्या संधी तयार झाल्या नाहीत. पण आता या परिस्थिती काहीसा बदल होताना दिसत आहे. सेवा क्षेत्र सध्या सेवा क्षेत्राची स्थिती चांगली होत असल्याचं चित्र आहे. मागील आर्थिक वर्षात सेवा क्षेत्रात विकास दर 7.7 टक्के होता. तर या आर्थिक वर्षात विकास दर 8.3 टक्के राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठं क्षेत्र आहे. याची भागीदारी तब्बल 57 टक्क्यांहून अधिक आहे. संबंधित बातम्या : नव्या वर्षात सरकारला धक्का, विकास दर घसरुन 6.5 टक्के?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget