E-Shram Card : ई-श्रम कार्डधारकांनो, निवडणुकांनंतर खात्यात येणार पैसे, फक्त करा 'हे' महत्वाचे काम
E-Shram Card : ई-श्रम कार्डधारकांनी हे महत्त्वाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा पुढील हप्त्याचा लाभ त्यांना मिळू शकणार नाही.
E-Shram Card : कोरोना महामारीच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर जेव्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हा याचा परिणाम विविध क्षेत्रांवर दिसून आला. देशात असा एक मोठा वर्ग आहे, जो असंघटित क्षेत्रात काम करतो. या क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सरकारकडून विविध योजना
लॉकडाऊनमध्ये तर काम नसल्यामुळे अनेक मजुरांना पायीच घरी परतावे लागले. काम न मिळाल्याने या लोकांसमोर खाण्यापिण्याचे संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार (central government) आणि राज्य सरकार (state government) त्यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवते. यामध्ये ई-श्रम कार्ड योजना, PM श्रम योगी मानधन योजना, बीपीएल रेशन कार्ड योजना प्रमुख आहेत. ई-श्रम कार्ड योजनेअंतर्गत, सरकार कामगारांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करते. सरकारी आकडेवारीनुसार, देशातील ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत सुमारे 24 कोटी मजुरांनी नोंदणी (ई-श्रम कार्ड नोंदणी) केली आहे. देशातील किमान 38 कोटी कामगार या योजनेत सहभागी होऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात, हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
या योजनेद्वारे मिळणाऱ्या सुविधा
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यावर, सरकारकडून 500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. याशिवाय, तुम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि पीएम श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत विमा पॉलिसी देखील दिली जाते. कोणत्याही कारणाने कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाखांची आर्थिक मदत मिळते. दुसरीकडे, अपंगत्वासाठी 2 लाख आणि अंशतः अपंगाच्या बाबतीत 1 लाखांची मदत दिली जाते.
...तर ई-श्रम कार्डच्या पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही
सरकार या कार्डद्वारे वेळोवेळी मजुरांना 500 रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही देते. या कार्डचा पुढील हप्ता येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. तुम्हालाही पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही तुमच्या बँक खात्याचे केवायसी लवकरात लवकर करून घ्यावे.
लवकरात लवकर KYC अपडेट करून घ्या...
पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर हे पैसे तुमच्या खात्यात लवकरात लवकर ट्रान्सफर केले जातील. केवायसी करण्यासाठी, तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन बँकेत जा आणि त्यांना दोन्ही खात्याशी लिंक करण्यास सांगा. यानंतर बँक खाते आधार आणि पॅन लिंक करेल आणि तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War: युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं, रशियाचा आरोप; मदतीसाठी सरसावणार!
- Ukraine Russia War: युक्रेनची रशियन सैनिकांच्या मातांना साद, मुलांना कीव्हमधून घेऊन जाण्याची विनंती
- Russia-Ukraine War : रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार, दोन्ही देशांमध्ये होणार दुसरी बैठक?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha